सुळेवाडी येथील युवक रनिंग व व्यायाम करण्यासाठी सुळेवाडी-देशवंडी रस्त्याच्या कडेने जात असतात. अजय कोंडाजी गुंजाळ, विशाल योगेश गुंजाळ व विकास सोमनाथ म्हस्के हे तीन युवक या रस्त्याच्या कडेने साइपट्टाने रनिंग करून व्यायाम करण्यासाठी थांबले होते. कपडे बदलत असताना अचानक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने या तिघा युवकांना जोरदार धडक दिली. या अपघातात अजय कोंडाजी गुंजाळ (१८) या युवकाचा मृत्यू झाला, तर विशाल गुंजाळ व विकास म्हस्के हे दोघे युवक जखमी झाले. या अपघातात दुचाकीस्वारही जखमी झाल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली. लष्कर, पोलीस व अन्य भरतीसाठी रनिंग व व्यायाम करणाऱ्या युवकांना अपघाताला सामोरे जाण्यासह एका युवकाचा प्राण गमवावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर. के. त्रिभुवन, हवालदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
रस्त्यालगत व्यायाम ठरला जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 4:16 AM