त्र्यंबकेश्वर : विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून विविध उपक्र म राबवावेत, असे आवाहन त्र्यंबक पंचायत समितीच्या सभापती ज्योती राऊत यांनी केले. रोहिले येथे आयोजित दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. रोहिले, ता. त्र्यंबकेश्वर येथे पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन येथील मातोश्री रेणुकाबाई हिरे आश्रमशाळेत आयोजीत करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका गटशिक्षण अधिकारी राजेंद्र शिरसाट यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक आर. बी. कोळपे यांनी केले. यावेळी गटशिक्षण अधिकारी राजेंद्र शिरसाट, तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष व्ही. बी. सानप, मुख्याध्यापक व्ही. एस. निकम, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व्ही. टी. नेरकर आदींसह विज्ञान अध्यापक संघाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान गुरुवारी पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत पारितोषिके वितरित करण्यात आली.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:23 AM