शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

भाजपा शहराध्यक्षांना मुदतवाढीची बक्षिसी

By admin | Published: November 22, 2015 10:47 PM

अनेकांचा मुखभंग : एक वर्ष मुदतवाढीची शक्यता

नाशिक : भाजपाच्या स्थानिक शहराध्यक्षांनी आपल्या दोन टर्ममध्ये केलेल्या कामगिरीची दखल घेऊन विशेष बाब म्हणून त्यांना एक वर्ष मुदतवाढीची बक्षिसी देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकीच्या निमित्ताने या पदासाठी आसुसलेल्या अनेकांचा मुखभंग होण्याची शक्यता आहे.भाजपात अनेक पदांसाठी अनेक निकष लावले जातात. त्यात ज्येष्ठताक्रमही असतोच. त्यानुसार विद्यमान अध्यक्षांना एकदा संधी मिळाली. पाठोपाठ दुसऱ्यांदाही पक्षश्रेष्ठींनी संधी दिली. या कालावधीत पक्षाची पारंपरिक सेनेबरोबर असलेली युती तोडून महापालिका निवडणूक भाजपाचा स्वतंत्र बाणा त्यांनी दाखवला. स्वबळावर सत्ता येण्याचे भाजपाचे स्वप्न धुळीस मिळाले; परंतु कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. अल्पमतात असतानाही पक्षाने पारंपरिक मित्रपक्ष शिवसेनेला नाकारून मनसेबरोबर सत्तेत जाऊन फळे चाखण्याची संधी मिळाली. मृदू संभाषण आणि संघटन कौशल्यामुळे तर मोठ्या प्रमाणात अन्य पक्षांतील कार्यकर्ते भाजपाकडे आकर्षित झाले. त्यामुळे पक्षाला आता सर्वगुणसंपन्न कार्यकर्ते मिळाले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतील कामकाज, त्यामुळे निवडणुकीत मिळालेले यश, तसेच पक्ष कार्यालयाला मिळालेले कार्पोरेट लूक त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला कुठल्याशी कंपनीत आल्याचा भास होत असून, कार्यालयीन शिस्तीमुळे कार्यकर्ते बोलवणे आल्याशिवाय अकारण कार्यालयात गर्दी करून थांबणे बंद झाले आहे. अशा अनेक मुद्द्यांचा विचार करून सध्या विद्यमान शहराध्यक्षांना पुढील महापालिका निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देऊन विशेष बक्षिसी देण्याची तयारी सुरू आहे. सध्या पक्ष घटनेत संघटनात्मक निवडणुकीद्वारे केवळ दोन वेळाच अध्यक्ष होता येत असले, तरी शहराध्यक्षांना या नियमातून बाद होऊ न देता विशेष मुदतवाढ देण्याची तयारी सुरू आहे. अर्थातच पक्षातील अत्यंत कार्यक्षम आणि आमदारानेच हा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर मांडला असून, त्यामुळे तो शहराध्यक्षांची ‘दिगंत’ खाक्या बघता तो अमान्य होणारच नाही, असे पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)