शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नवीन वर्षात कृषी क्षेत्राकडून तेजीची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 10:02 PM

ओझर : सरते वर्ष २०२० हे जानेवारीत मोठ्या दिमाखात सुरू झाले असताना कोरोनाच्या लॉकडाऊनने अर्धे वर्ष निराशाजनक गेले असले तरी शिथिल झालेल्या लॉकडाऊनमुळे उत्साह दिसून आला. नवीन वर्षात कृषी क्षेत्राकडून तेजीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षात मंदीच्या लाटेबरोबरच अवकाळीने द्राक्षपंढरीही ठप्प

ओझर : सरते वर्ष २०२० हे जानेवारीत मोठ्या दिमाखात सुरू झाले असताना कोरोनाच्या लॉकडाऊनने अर्धे वर्ष निराशाजनक गेले असले तरी शिथिल झालेल्या लॉकडाऊनमुळे उत्साह दिसून आला. नवीन वर्षात कृषी क्षेत्राकडून तेजीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षात कृषी क्षेत्रात देखील अच्छे दिन येणार हे स्पष्ट दिसत असताना द्राक्ष पंढरीत मोठी उलाढाल होत असताना मार्चच्या शेवटच्या टप्प्यात असताना कोरोनाने तेजीत सुरू असलेल्या बाजारात मंदीची लाट आली. पोलिसांनी गावातल्या प्रत्येक गल्लीला छावणीचे रूप दिले. सरकारचे सूक्ष्म नियोजन देखील तितकेच प्रभावशाली ठरले. मुंबईला काम करणारे परप्रांतीय मिळेल त्या वाहनाने उत्तरेकडे कूच करत होते. त्यावेळची ती विदारकता अनेकांच्या मनातून अद्याप गेलेली नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने त्यांना उपाशी न ठेवता आपल्या संस्कृतीचे दर्शन दिले. नियमांचे उल्लंघन केलेल्या अनेकांना दंडुक्याचा प्रसाद मिळाला तर तितके गुन्हे देखील दाखल झाले.कित्येकांच्या परिवाराच्या कर्त्यांना कोरोनामुळे जग सोडावे लागले ही गोष्ट या वर्षीची सर्वाधिक मारक बाब ठरली. बाजारातील निर्देशांक देखील झपाट्याने कोसळला तर अनलॉक होत असताना त्याने हवा तसा आधार देखील दिला.यंदाची दिवाळी कशी जाणार या चिंतेत सर्वच असताना त्याआधी एक एक टप्पा शिथिल करताना नागरिकांनी देखील बाजारात नवे चैतन्य आणले. अनेक पेठांमध्ये न भूतो अशी गर्दी झाली तर उलाढालीचे उच्चांक देखील मोठ्या दिमाखात अनेक क्षेत्राने गाठले. कृषी,पर्यटन,हॉटेल,निर्यात,आयात,रिटेल आदी क्षेत्र स्थिरावत गेले तर दिवाळी देखील लोकांनी ह्यकोरोना नव्हेचह्ण असे दाखवत बाजारात चैतन्य आणण्यात मोठा हातभार लावला. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी देखील बाजार पूर्वपदावर येत असताना त्याला नफ्याची मोठी धार लागल्याने दिवाळी नंतरदेखील बाजार स्थिर राहून गेला.कांदा निर्यातबंदी उठविल्याने उत्साहसरते शेवटी डिसेंबरच्या अखेर कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकणारा ठरला.येणाऱ्या २०२१ मध्ये तेजीची हीच झालर कायमस्वरूपी राहिल्यास मुख्य कणा असलेल्या कृषी क्षेत्रात देखील नवे इतिहास रचले जातील परंतु कोरोनाची काळजी मनाच्या एका कोपऱ्यात सुरवातीचे काही महिने तरी घर करून बसेल हे मात्र तितकेच स्पष्ट आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी