सिन्नर : पाठ्यपुस्तकात असलेल्या सार्वजनिक सुखसुविधा व व्यवस्था या प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिकांद्वारे जाणून घेतल्यास अधिक प्रभावी ठरते. या अध्यापन तंत्राचा वापर करून एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक शाळेतील चौथीच्या २१० विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून आगळावेगळा अनुभव घेतला. मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाणे व सारस्वत बॅँक शाखेला भेट देऊन बॅँकेतील आर्थिक देवाणघेवाण व पोलीस ठाण्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत माहिती जाणून घेतली. संस्थेचे सचिव राजेश गडाख यांच्या परवानगीने मुख्याध्यापक उदय कुदळे, वर्गशिक्षक विनायक काकुळते, पांडुरंग लोहकरे, कविता शिंदे, गणेश सुके यांनी या क्षेत्रभेटीचे नियोजन केले होते. शासनाच्या वतीने राबविण्यात येणाºया विविध शिष्यवृत्ती व लाभाच्या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांचे बॅँकेत खाते असणे अनिवार्य आहे. तसेच त्या खात्यातील रक्कम काढणे अथवा भरण्यासाठी विद्यार्थी व पालक यांच्या संयुक्त खात्यातून हा व्यवहार पूर्ण होणार असल्याने बॅँकेतील व्यवहाराचे ज्ञान विद्यार्थ्यांना असणे गरजेचे झाले आहे. लहान वयापासूनच बचत करणे व पैसे तसेच मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी बॅँकेत उत्तम सुविधा असते हे मुलांना समजने गरजेचे आहे. त्यासाठी मुलांना आजचा अनुभव महत्त्वाचा ठरला. सारस्वत बॅँकेचे अधिकारी सुनील बागुल, योगेश जोशी, सुरेश भालेराव, जितेंद्र भदाणे यांनी सविस्तर माहिती दिली. एटीएम व के्रडीट कार्ड यात व्हिसा व रुपी हे दोन प्रकार असून, रुपीचे पैसे हे आपल्या देशातील अर्थव्यवस्थेत उपयोगी पडतात म्हणून रुपीचे कार्ड वापरावे, असे आवाहन करून त्यांनी आॅनलाइन व्यवहाराची माहिती दिली. पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. पोलीसांविषयी विनाकारण भीती वाटू देऊ नये, ते आपले मित्र असतात. आपले रक्षण करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राखण्याचे महत्त्वाचे काम करतात. गुन्हेगाराचा शोध घेतात व त्यांना शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करतात असे त्यांनी सांगितले.
अनुभव : सिन्नरच्या एस. जी. पब्लिक स्कूलचा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांनी जाणून घेतले कायदा सुव्यवस्थेचे महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:42 PM
सिन्नर : पाठ्यपुस्तकात असलेल्या सार्वजनिक सुखसुविधा व व्यवस्था या प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिकांद्वारे जाणून घेतल्यास अधिक प्रभावी ठरते.
ठळक मुद्देक्षेत्रभेटीतून आगळावेगळा अनुभवकायदा सुव्यवस्थेबाबत माहिती