शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

अक्षय पसायदानासाठी एक तरी वारी अनुभवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:32 AM

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल... विठ्ठलाला पहाणं म्हणजे वारी. विठ्ठल बोलणं म्हणजेही वारी. विठ्ठलाशी बोलणं म्हणजे वारी. विठ्ठलाबाबत बोलणंही वारीच. आयुष्यात एखादी गोष्ट वारंवार करीत रहाणे म्हणजे वारी करणे. वारी वारी जन्म मरणाने वारी. ती ही वारी. एकदा दर्शन देऊन जी संपत नाही ती वारी. एकदा आषाढी देवशयनी एकादशीला विठ्ठल झोपला की कार्तिकीलाच उठतो. मग वारकरी पंढरपुरात जातो म्हणजे देवदर्शन घेऊन नांगरणी, पेरणी करून तृप्त होतो.

किशोर पाठकबोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल... विठ्ठलाला पहाणं म्हणजे वारी. विठ्ठल बोलणं म्हणजेही वारी. विठ्ठलाशी बोलणं म्हणजे वारी. विठ्ठलाबाबत बोलणंही वारीच. आयुष्यात एखादी गोष्ट वारंवार करीत रहाणे म्हणजे वारी करणे. वारी वारी जन्म मरणाने वारी. ती ही वारी. एकदा दर्शन देऊन जी संपत नाही ती वारी. एकदा आषाढी देवशयनी एकादशीला विठ्ठल झोपला की कार्तिकीलाच उठतो. मग वारकरी पंढरपुरात जातो म्हणजे देवदर्शन घेऊन नांगरणी, पेरणी करून तृप्त होतो. बाबांनो देव नाही झोपत तो तडक पंढरीतून निघून सरळ आपल्या घरात, शेतात राबायला येतो. तो दळण दळतो, शेतातल्या बियांना अंकुर फोडतो. तो पाऊस होऊन पावसातून बरसतो. आपलं धान्य पिकवतो. फळा-फुलांनी संसार पिकवतो. म्हणून आपण निश्चिंत वारी करायला.स्वत:चं घर, संसार न सोडणाऱ्या सावता माळ्याच्या शेतात तो भेटायला येतो. कांदा मुळा भाजी म्हणत तीच अवघी विठाई माझी म्हणणारा भक्त परमेश्वराला साकडं घालतो. म्हणून पुढची एकादशीची यात्रा सावत्याकडे. ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या एकत्र येतात. तो क्षण अवर्णनीय. दोघांची गळाभेट सोबत निवृत्ती, सोपान, मुक्ताई आहेच नाथ आहेत. ज्ञानोबा मामाच्या घरी विसाव्याला थांबून पुढे येतात. दोघांचे मार्ग भिन्न. दिवेघाट चढताना एरवीचा धापा टाकणारा म्हातारा सहज जमिनीचं पाणी आढ्याला लागलं म्हणत दिवेघाट चढतो. एकदा घाट चढला की विसावा. मग माउली पावली शरीर टाळ-मृदंग होतो. अंतरात घुमत राहतो. दिंडीत प्रत्येक व्यक्ती माउलीच. एखादा पुढे जातो मधे अडखळतो ‘माउली’ हाक दिली की रस्ता तयार. काय ही शिस्त. प्रत्येकाला एकच ध्यास विठ्ठलाचा. येथे जात धर्म पंथ नाहीत. सगळेच भागवत संप्रदायी. वारीला गेलो तेव्हाची गोष्ट. चालण्याची फार सवय नसल्याने पायाला फोड आले. वरती टळटळीत ऊन, पावसाची वाट पहाणे, बाजूला झाडाखाली विसावलो. सोबतचे मित्र एकमेकांचे पायाचे फोड चाचपत होते. तोच एक म्हातारा, अनवाणी शेजारी येऊन बसला. म्हटलं माउली कुठून आलात. परतूर म्हणाला. म्हटलं पायात काही नाही. फोड येतील. म्हाताºयाने पाय दाखवला. एकही फोड नाही. आम्ही आश्चर्यचकित. म्हटलं, माउली वय किती? पंचाहत्तर. माउली बोलावते, ती घेऊन जाते. आमचे पायाचे फोड आपोआप बरे झाले. माउली खाऊ-पिऊ घालते. वेलापूरपर्यंत सारेच वारकरी थकलेले पण तो धाव्याचा क्षण येताच सगळे वारकरी जीव घेऊन उतारावर पळत सुटतात. जणू तुकोबासारखे झाले आपल्यालाही विठ्ठलदर्शन. माता, माउली डोक्यावर कळशा, हंडे, तुळशीवृंदावन घेऊन पळत सुटतात. विठ्ठलमय होतात. असा विठ्ठल बोलावा, बोलवावा. आयुष्यात एक तरी वारी (ओवी) अनुभवावी. मानवता, सात्त्विकता, अथांग भक्ती काय आहे हे कळतं. निदान ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीसोबत आळंदी-पुणे, देहू-पुणे, पुणे-सासवड मोठ्ठा टप्पा पार करावा. मग माउली पाठीवरून प्रेमाचा हात फिरवते. आपल्याला अक्षय पसायदान देते.(लेखक साहित्याचे अभ्यासकव कवी आहेत.)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम