शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

उपक्रमशील शिक्षकांचे अनुभव कथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 1:05 AM

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे विद्यार्थ्यांची गळती होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास व प्रगती साधण्यासाठी झटणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांनी गुरुवारी आपले अनुभव कथन करताना येणाºया अडचणीही पदाधिकारी, प्रशासन प्रमुखांसमोर मांडल्या. निमित्त होते शिक्षण विभागाच्या ‘कट्टा शिक्षणाचा’ उपक्रमाचे. यावेळी शिक्षकांची उपक्रमशीलता वाढविण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.

ठळक मुद्देशिक्षण कट्टा : अडचणी सोडविण्याचे आश्वासन

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे विद्यार्थ्यांची गळती होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास व प्रगती साधण्यासाठी झटणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांनी गुरुवारी आपले अनुभव कथन करताना येणाºया अडचणीही पदाधिकारी, प्रशासन प्रमुखांसमोर मांडल्या. निमित्त होते शिक्षण विभागाच्या ‘कट्टा शिक्षणाचा’ उपक्रमाचे. यावेळी शिक्षकांची उपक्रमशीलता वाढविण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वार्षिक नियोजनांचा आराखडा तयार केला असून, त्यानुसार गुरुवारपासून ‘कट्टा शिक्षणाचा’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्ह्णातील ग्रामीण भागात विद्यादानाचे काम करणाºया काही शिक्षकांनी कोणतेही पाठबळ नसताना स्वत:च्या हिमतीवर शाळांमध्ये बदल घडवून आणतानाच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. अशा उपक्रमशील शिक्षकांना महिन्यातून एकवेळा जिल्हा परिषदेत बोलावून शिक्षण क्षेत्रात काम करणाºया व्यक्ती, संस्था, शिक्षकांसमोर त्यांचे अनुभव, गुणवत्ता वाढीसाठी केले प्रयत्न, आलेले अनुभव व साधलेल्या शैक्षणिक प्रगतीचे सादरीकरण केले जाणार आहे. त्याची सुरुवात केशव गावित (हिवाळी, त्र्यंबकेश्वर), प्रकाश चव्हाण (करंजवण, दिंडोरी) व नंदलाल अहिरे (पिंपळगाव गरुडेश्वर, नाशिक) या शिक्षकांपासून करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, शिक्षण सभापती यतिन पगार, ‘सकाळ’चे संपादक श्रीमंत माने, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर उपस्थित होते.केशव गावित हे वर्षातील ३६५ दिवस सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत शाळा भरवितात. तसेच त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शाळेचा कायापालट केला आहे, तर प्रकाश चव्हाण यांनी बोरस्तेवाडी येथील वस्तीशाळेची दुरुस्ती स्वत:च्या बळावर केली, त्याचबरोबर शेतमजुरांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. नंदलाल अहिरे यांनीदेखील पटवाढीसाठी विविध उपक्रम राबविले त्याचबरोबर स्वयंअध्ययनासाठी साहित्याची निर्मिती केली आहे. तिघा शिक्षकांनी आपले सादरीकरण केले. त्यावर उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करून, त्याची व्याप्ती वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन समग्र शिक्षणाचे दराडे यांनी केले. अधिकाधिक शिक्षकांना माहिती देणारजिल्हा परिषदेच्या शिक्षकांची संख्या पाहता, अधिकाधिक शिक्षकांना या उपक्रमशीलतेची माहिती दिली जावी जेणेकरून त्यांनाही प्रोत्साहन मिळू शकते, असे आवाहन केले. शाळा व शिक्षकांना भेडसाविणारे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.