शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

इगतपुरी, त्र्यंबक निवडणुकीत ‘कॉप’ चा प्रायोगिक वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 4:01 PM

निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदान केंद्रात जाताना मतदाराला उमेदवारांची माहिती देण्यासाठी ठळक अक्षरात माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे, टु वोटर अ‍ॅपद्वारे उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची बारकाईने तपासणी करण्यात यावी, आदर्श मतदान केंद्र तयार करण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे,

ठळक मुद्देसहारिया : निवडणुक तयारीचा आयुक्तांकडून आढावाअ‍ॅप्लिकेशनचा वापर यशस्वी झाल्यास देशपातळीवर ते वापरण्यात येणार

नाशिक : राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी गुरूवारी जिल्ह्यात होऊ घातलेल्या इगतपुरी, त्र्यंबक नगरपालिका निवडणूक तयारीचा आढावा घेऊन नगरपालिका निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीसाठी आयोगाने तयार केलेली ‘सिटीझन आॅन पेट्रोल’ (कॉप) हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले असून, त्याचा प्रायोगिक वापर या निवडणुकीसाठी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या अ‍ॅप्लिकेशनचा वापर यशस्वी झाल्यास देशपातळीवर ते वापरण्यात येणार असल्याचे सांगितले.जे. एस. सहारिया यांच्या उपस्थितीत इगतपुरी येथे आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, या अ‍ॅपच्या माध्यमातून जनतेला लोकशाहीच्या दृष्टीने सक्षम करणयाचे काम करण्यात येत आहे. अ‍ॅपवर येणा-या तक्रारींची तातडीने दखल घेण्यात यावी, अ‍ॅपच्या वापराबाबत निवड केलेल्या नागरिकांना प्रशिक्षण देण्यात यावे, नागरिकांनी न घाबरता तक्रार केली तर आदर्श निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकेल. निवडणुकीनंतर स्वतंत्र संस्थेमार्फत अ‍ॅपच्या उपयुक्ततेचा अभ्यास करण्यात येणार आहे. निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदान केंद्रात जाताना मतदाराला उमेदवारांची माहिती देण्यासाठी ठळक अक्षरात माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे, टु वोटर अ‍ॅपद्वारे उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची बारकाईने तपासणी करण्यात यावी, आदर्श मतदान केंद्र तयार करण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, अपंगासाठी रूग्णाहिका आणि व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकाºयांनी त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा सक्षमपणे वापर करावा.यावेळी निवडणूक उप आयुक्त अविनाश सणस यांनी सांगितले की, ‘कॉप’च्या माध्यमातून येणाºया तक्रारींबाबत तक्रार करणाºयाची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे. या अ‍ॅपचे आंतरराष्टÑीय परिषदेत ५३ राष्टÑांनी कौतुक केले असून, अ‍ॅपबाबत मातिही जाणून घेतली आहे. इगतपुरी व त्र्यंबकेश्वरपासून त्याचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात येणार असून, तो यशस्वी ठरल्यास राष्टÑीय पातळीवर मार्गदर्शक ठरेल. या बैठकीत पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पोलीस यंत्रणेच्या तयारीची माहिती दिली. निवडणुकीसाठी एक एसआरपी कंपनी आणि दोनशे होमगार्डची मागणी वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्याचे सांगितले. अपर जिल्हाधिकारी निलेश सागर यांनी निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी अधिकाºयांनी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी असे आवाहन केले.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय