लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांना आजाराचे योग्य निदान लवकर होऊन उपचाराची दिशा त्वरित ठरावी यासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात ‘टेलि- रेडिओग्राफी’ सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून, या सुविधेमुळे रुग्णांना उपचारासाठी मुंबईस्थित नामांकित हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने रुग्णांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.कळवणसारख्या ग्रामीण भागात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात विविध सुविधा आहेत. यापूर्वी येथे टेलिमेडिसीन सुविधादेखील सुरू झाली असून, त्याचा आजवर हजारो रुग्णांनी लाभ घेतला आहे. टेलिमेडिसीनच्याच धर्तीवर आता राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने टेलिरेडिओग्राफी सुविधा गेल्या शुक्रवारपासून (दि.७) कार्यान्वित केली आहे. या सुविधेमुळे रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात एक्स-रे काढल्यानंतर त्याच्या निदानासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यायचे असल्यास एक्स-रेची सॉफ्ट कॉपी मुंबईस्थित तज्ज्ञ डॉक्टरांना पाठवली जाणार असून, त्या डॉक्टरांकडून उपचाराविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे विविध प्रकारच्या दुर्धर आजारांचे लवकर निदान होण्यास मदत होणार आहे.कळवण उपजिल्हा रुग्णालयात कार्यान्वित झालेल्या या सुविधेमुळे कळवण, सुरगाणा, देवळा या ग्रामीण भागातील सवर्सामान्य रुग्णांना फायदा होणार आहे.अनेक आजारांच्या टेस्टिंगसाठी एक्स-रे महत्त्वाचा असून, त्याचा रिपोर्ट हा टेलिरेडिओग्राफीच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्यावर योग्य उपचाराची दिशा ठरणार असल्याने रुग्णाला त्याचे निदान व आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणारे उपचार तत्काळ मिळणार आहेत. टेलिरेडिओग्राफी सुविधेमुळे आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णांना दुर्धर आजाराचे निदान लवकर समजण्यास मदत होणार असून, तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचारासाठी टेलिरेडिओग्राफीच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणार असल्याने रुग्णांची वेळेची व पैशाची बचत होणार आहे.- डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा रुग्णालय, कळवण
टेलिरेडिओग्राफीमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:49 PM
लोकमत न्यूज नेटवर्क कळवण : ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांना आजाराचे योग्य निदान लवकर होऊन उपचाराची दिशा त्वरित ठरावी यासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात ‘टेलि- रेडिओग्राफी’ सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून, या सुविधेमुळे रुग्णांना उपचारासाठी मुंबईस्थित नामांकित हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने रुग्णांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
ठळक मुद्देदिलासा : कळवण उपजिल्हा रुग्णालयात सुविधा कार्यान्वित; उपचाराची दिशा ठरणार