नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रु ग्णांना जागतिक हिवतापदिनानिमित्त वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. पी. बांबळे यांनी हिवताप नियंत्रण तसेच विविध उपचारपद्धती याविषयी मार्गदर्शन केले.बेलगाव कुºहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गुरुवारी (दि.२५) जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. हिवताप विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्र ीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने विविध उपक्र मांद्वारे नागरिकांपर्यंत पोहचिवण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलांनी या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.हिवताप हा प्लाझमोडीयम या परोपजीवी जंतूंमुळे होणारा व मादी अॅनाफिलीस डासांच्या चावण्यामुळे पसरणारा आजार आहे. डांगे व चिकुणगुण्या हे विषाणूजन्य आजार आहे. त्यांचा प्रसार एडिस ईजिप्ती प्रकारच्या डासांमुळे होतो. हे सर्व आजार वेळीच औषधोपचार करून बरे करता येतात. मात्र वेळीच उपचार न केल्यास प्राणघातक ठरु शकतात असे मार्गदर्शन डॉ. बांबळे यांनी रु ग्णांना केले. यावेळी सर्वांनी हिवताप निर्मूलन करण्यासाठी शपथ घेण्यात आली.या कार्यक्र माप्रसंगी वैद्यकीय अधिकारी श्रीमती संगिता पवार, औषध निर्माण अधिकारी पी. एस. गोसावी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे. पी. वाघ, श्रीमती ज्योती भोर, आरोग्य सहाय्यक आर. ए. सपकाळ, आर. बी. राऊत, आरोग्यसेविका एस. जी. ढगे, परिचर राजेश तोकडे, श्रीमती जयश्री नंदवाणी आदीकर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
जागतिक हिवताप दिनी रूग्णांना तज्ञांचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:19 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रु ग्णांना जागतिक हिवतापदिनानिमित्त वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. पी. बांबळे यांनी हिवताप नियंत्रण तसेच विविध उपचारपद्धती याविषयी मार्गदर्शन केले.
ठळक मुद्देनांदूरवैद्य : बेलगाव कुºहे प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपक्रम