देवगाव : येथील प्राथमिक शाळेला जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांनी गुरुवारी दिलेल्या अचानक भेटीत कालबाह्य पोषण आहार आढळल्याने त्यांनी संताप व्यक्त केला असून, संबंधित अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी काढली.पोषण आहार संबंधित अधिकारी व्ही. एम. बैसाणे व केंद्रप्रमुख जनार्दन पगारे यांना बोलावून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्याध्यापक जर त्वरित उपलब्ध होऊ शकत नसतील तर आता शाळेवर असलेल्या शिक्षकांमधून वरिष्ठ शिक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी विलास शिंदे, लहानू मेमाणे, भागवत बोचरे, संतोष गव्हाणे, संतोष घाडगे, रामहरी शिंदे, जयेश लोहारकर, श्रीहरी बोचरे, योगेश पिंपळे, दत्तू बोचरे, गुळवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.काय सापडले भेटीत ?मुख्याध्यापक गैरहजर. लोकवर्गणीतून साकारलेल्या ई-लर्निंग प्रोजेक्टर रूममध्ये जाळे जळमटे. ई-लर्निंग प्रोजेक्टर वायर उंदराने कुरतडलेल्या अवस्थेत. किचन रूममध्ये २०१५-१६ चे खाद्य तेल. रेकॉर्डपेक्षा जास्त पोषण आहाराचा साठा. मुदतबाह्य हळद पावडर. कीड लागलेली मटकी
कालबाह्य पोषण आहार आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 11:50 PM