नाशिक : मोटार वाहन कागदपत्रांची मुदत संपली असली तरी ती आता सप्टेंबरअखेरपर्यंत वैध राहणार आहेत. तसेच परिवहन विभागाकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.मोटार वाहन कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पीयूसी प्रमाणपत्र,नवीन वाहन नोंदणी किंवा वाहन विमा तसेच इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे ज्यांची वैधता संपलेली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे त्यांच्या नूतनीकरण करण्यात अडचणी येत आहेत. त्यासंबंधित कागदपत्रांची मुदत वाढवण्यात येत असल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. यापूर्वी केंद्रीय मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना दि. ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तीच मुदतवाढ आता दि. ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रादेशिक आणि विभागीय परिवहन खात्याला देण्यात आले आहेत. तसेच त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
मुदत संपलेली मोटार वाहन कागदपत्रे सप्टेंबरपर्यंत वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 6:50 PM
नाशिक : मोटार वाहन कागदपत्रांची मुदत संपली असली तरी ती आता सप्टेंबरअखेरपर्यंत वैध राहणार आहेत. तसेच परिवहन विभागाकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
ठळक मुद्देकागदपत्रांची मुदत संपलीपरिवहन विभागाकडून अंमलबजावणी