शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

‘ओखी’ने रोखली कोट्यवधींची निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 11:30 PM

सटाणा : वेळ : सकाळी ११ वाजता ठिकाण : पिंगळवाडे राज्यात अर्ली द्राक्ष पिकाची पंढरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात यंदा ‘ओखी’ या अस्मानी संकटामुळे मोठा तडाखा बसला आहे.

ठळक मुद्दे द्राक्ष पिकाची मोठ्या प्रमाणात हानी बिग बागायतदाराला दृष्ट

सटाणा : वेळ : सकाळी ११ वाजता ठिकाण : पिंगळवाडे राज्यात अर्ली द्राक्ष पिकाची पंढरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात यंदा ‘ओखी’ या अस्मानी संकटामुळे मोठा तडाखा बसला आहे. सातासमुद्रपार अवीट गोडीने भुरळ घालणाºया द्राक्षाची यंदा ओखीने मात्र निर्यात रोखली आहे. या अस्मानी संकटामुळे द्राक्ष पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, तब्बल पंधराशे हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष पीक बाधित होऊन सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांहून अधिक नुकसान होऊन द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाल्याचे वास्तव चित्र बागलाणमध्ये बघायला मिळत आहे. कसमादे पट्ट्यात एेंशीच्या दशकाअखेरीस द्राक्ष पीक आले. प्रयोगशील शेतकरी म्हणून बागलाणच्या शेतकºयाची सर्वदूर ख्याती आहे. या प्रयोगशील शेतकºयामुळे नव्वदच्या दशकात हे पीक अधिक फोफावले. दोन एकर द्राक्ष पिकाचे क्षेत्र असलेल्या शेतकºयाची गणनादेखील ‘बिग बागायतदार’ म्हणून होऊ लागली; मात्र १९९० ते १९९९ या काळात अवकाळी पाऊस, गारपीट, पाणीटंचाई या अस्मानी संकटामुळे बिग बागायतदाराला दृष्ट लागली. सातत्याने येणाºया या संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अक्षरश: देशोधडीला लागला. यामुळे द्राक्ष पिकाचे शेतकºयांनी बागलाणमधून उच्चाटनच केले.दरम्यानच्या काळात सन २००० ते २००२ मध्ये करंजाडी खोºयातील शेतकºयांनी विदेश दौरे करून परदेशातील बाजारपेठेचा अंदाज करून ‘अर्ली द्राक्ष’ पीक घेण्याची संकल्पना पुढे आणली. भरमसाठ पैसा देणारे पीक म्हणून डाळिंब पीक पर्याय म्हणून द्राक्ष पीक पुन्हा फोफावले.करंजाडी खोरे, हत्ती, कान्हेरी, आरम आणि मोसम खोºयासह काटवन, मालेगाव तालुक्यातील माळमाथा, मालेगाव पश्चिम, दक्षिण, देवळा, कळवण पूर्व, उत्तर, दक्षिण मध्ये हे पीक घेतले जात असल्यामुळे आज बागलाण अर्ली द्राक्षाची पंढरी म्हणून नावारूपाला आले आहे; मात्र या द्राक्ष पंढरीला पुन्हा अस्मानीचे ग्रहण लागल्याने शेतकरी पुरता धास्तावला आहे.यंदा ‘मोअर रिस्क, नो मनी, गो मनी’अर्ली द्राक्ष हंगाम जून महिन्यापासून सुरू होतो. जून, जुलै महिन्यात द्राक्षाची गोडी छाटणी करून बहार घेतला जातो. जून ते आॅक्टोबर या पावसाच्या वातावरणावर मात करून कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा अत्यल्प प्रमाणात वापर करून निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. याला रशियन आणि आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे पैसाही चांगला मिळतो. अडचणींचा सामना करून जास्त पैसा देणारे पीक म्हणून अर्ली द्राक्षाकडे बघितले जाते. म्हणूनच इंग्रजीत ‘’मोअर रिस्क, मोअर मनी’’ म्हटले जाते. आदल्या दिवशी दीडशे रु पये किलोने झालेले सौदे दुसºया दिवसी अवकाळी पाऊस आणि ओखीच्या वादळाने होत्याचे नव्हते झाले. द्राक्षाचे घड सडल्याने अक्षरश: मजुरांना खिशातून पैसे देऊन त्याची विल्हेवाट लावावी लागली. त्यामुळे यंदा ‘मोअर रिस्क, नो मनी, गो मनी’ अशीच भयावह परिस्थिती राहिली. या अस्मानी संकटामुळे यंदा द्राक्षाचा ‘बिग बागायतदार‘ कमालीचा धास्तावला असून, आर्थिक फटका बसून कर्जबाजारी झाला आहे.