निफाड : चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठानने अधिक उत्पादन व निर्यातक्षम असलेल्या लसणाच्या यमुना सफेद-९ (जी-३८६) या नवीन वाणाची निर्मिती केली आहे.औषधी गुणधर्म असलेल्या व स्वयंपाकघरात हमखास आढळणाऱ्या लसणाच्या नवीन वाणाची चितेगाव येथील संशोधन केंद्रात निर्मिती करण्यात आली आहे. हे वाण अधिक उत्पादन व निर्यातक्षम असून, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कंदवर्गीय हे पीक देशात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. लसणात प्रोटिन्स, फॉस्फरस, कॅल्शिअम, मॅग्नशिअम आणि कार्बोहायड्रेड आदि घटक असातात. हिरव्या लसणीमध्ये एस्करविक आम्ल अधिक प्रमाणात असतात. लसूण हे आता अधिक दर्जेदार आणि भरघोस उत्पादन घेता येईल, असे हे नवीन वाण एनएचआर डीएफने विकसित केल्याची माहिती डॉ. आर.के. सिंग यांनी दिली.सन २०१५-१६ मध्ये भारतात २.८१ लाख हेक्टर जमिनीवर १६.१७ लाख मेट्रिक टन लसणाचे उत्पादन घेतले गेले. लसणाची उत्पादकता ५.७६ टन हेक्टरज आहे. जी इतर देशांच्या तुलनेने खूपच कमी आहे. त्यामुळे या संस्थेने लसणाचे भारतातील उत्पादन वाढावे यासाठी यमुना सफेद-९ (जी- ३८६) या नवीन वाणाची निर्मिती केली आहे.
लसणाच्या निर्यातक्षम वाणाची निर्मिती
By admin | Published: February 03, 2017 12:41 AM