सुदर्शन सारडा। लोकमत न्यूज नेटवर्कओझर : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षांची अधिक निर्यात झाल्याने लोकल बाजारपेठेचा भाव निर्यातीला मिळत असल्याने बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय द्राक्षांची सर्वाधिक मागणी असलेल्या युरोप प्रांतात यंदा अपेक्षेपेक्षा जास्त कंटेनर निर्यात झाल्याने भाव जरी कोसळले असले तरी ते स्थिर आहे.द्राक्षांच्या निर्यातीमध्ये भारतातील ऐंशी टक्के वाटा असणाऱ्या नाशिकचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात तो आवरणार असल्याचे चित्र दिसत असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र निसर्गाने चांगली साथ दिली होती. त्यामुळे निर्यातक्षम उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. निर्यात उंचावली, भाव मंदावले असली तरी भावाची सरासरी बागायतदारांना दिलासा देणारी न ठरल्याने ती चिंतेची बाब बनली आहे.नाशिकहून सर्वात जास्त निर्यात ही युरोप खंडात होत असते. मागील वर्षीच्या बागांना परतीच्या पावसानी दिलेल्या फटक्यामुळे बाजारातील आवक घटणार असल्याचे निष्पन्न झाले होते. साधारण एप्रिलपर्यंत बागा आटोपून झाल्यावर निफाड, दिंडोरी, खेडगाव, साकोरे पट्ट्यात सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यानंतर छाटणीला प्रारंभ झाला. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शेतकऱ्यांनी आपल्या कामांना प्रारंभ केला. यंदादेखील वातावरण पोषक होते; परंतु पहिल्या दिवसापासून उंचावलेल्या दरांमुुुळे यंदाची उलाढाल उंचीवर राहील असे चित्र होते; परंतु बाहेर मागणी घटली व मालाची आवक तशीच राहिल्याने भाव खाली येण्यास सुरुवात झाली. मागील वर्षी जो भाव भारतीय बाजारात होता तो यंदा निर्यातक्षम द्राक्षांना असल्याने झालेल्या खर्चाची जमवाजमव कशी करावी हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे. द्राक्ष आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी तर यंदा आर्थिक गर्तेत असल्याचे दिसून आले आहे.यंदाचा निर्यातभाव देशनिहायरशिया- ३० ते ३२ रुपयेयुरोप- ४० ते ४५ रुपयेथायलंड व तैवान (इतर कलर व्हरायटी)- ७० ते ७५ रुपये२०१६-१७ मध्ये ६८९५ कंटेनर युरोप खंडात निर्यात झाले होते. त्यात एकूण ९०९९३ मेट्रिक टन द्राक्षांचा समावेश होता, तर नॉन युरोपमध्ये १७५० कंटेनर गेले. त्यात एकूण ४०९८७ मेट्रिक टन मालाचा समावेश होता. मागील वर्षी जवळपास ८६४५ कंटेनरची निर्यात झाली. १७-१८ मध्ये मात्र ६००० च्या जवळपास युरोप प्रांतात तर जवळपास १२५० इतर देशात निर्यात झाली आहे. यंदाचा आकडा हा दोन्ही वर्षांपेक्षा जास्तच राहणार असल्याचे प्रथदर्शनी दिसून येत आहे.————————————पूर्ण भारतातून निर्यातीपैकी ऐंशी टक्के निर्यात नाशकातून होत असते. यंदा माल भरपूर असल्याने भाव कमी आहेत. भावाचा जर सरासरी विचार केला तर ४० ते ४५ रु पये प्रति किलो आहे. चायनाला यंदा बहुतेक निर्यातदारांनी पाठ दाखविली असून, व्यापारी धोरण याला कारणीभूत ठरले आहे. सांगली, सातारा भागानेदेखील यंदा चांगल्याप्रकारे निर्यात केली आहे.- तुषार शिंदे, एक्स्पोर्टर, ओझर.
निर्यातक्षम द्राक्षांना कवडीमोल भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 7:00 PM
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षांची अधिक निर्यात झाल्याने लोकल बाजारपेठेचा भाव निर्यातीला मिळत असल्याने बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय द्राक्षांची सर्वाधिक मागणी असलेल्या युरोप प्रांतात यंदा अपेक्षेपेक्षा जास्त कंटेनर निर्यात झाल्याने भाव जरी कोसळले असले तरी ते स्थिर आहे.
ठळक मुद्देउत्पादकांच्या चिंतेत भर : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक निर्यात