लासलगाव : लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांदा विविध रेल्वे स्थानकावरून कोरोना संकटातही रेल्वेने बांगलादेशला रवाना करण्यात आला आहे. याद्वारे रेल्वेने २२ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे. यात निर्यायतदारांना समाधानकारक उत्पन्न मिळाले असले तरी उत्पादकांच्या पदरी अल्प वाटा पडला आहे.मागणी वाढल्याने मध्य रेल्वेकडून मालगाड्यांद्वारे बांगलादेशाला कांद्याची निर्यात करण्यात येत आहे. कोरोनासह गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात अडकलेल्या जिल्ह्यातील बळीराजासह निर्यातदारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत १.२६ लाख टन कांदा पाठवण्यात आला आहे. रेल्वेला यापोटी तब्बल २२ कोटी रु पयांचे उत्पन्न मिळाले आहे.मात्र ज्यांनी हा कांदा पिकवला त्या शेतकऱ्याला तुटपुंजा भाव मिळाल्याने बळीराजा चिंतेत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी वाढली. एक लाख मेट्रिक टनाहून अधिक कादा रेल्वेच्या माध्यमातून बांगलादेशात निर्यात झाला. यातून रेल्वे आणि निर्यातदारांना समाधानकारक उत्पन्न मिळालेअसले तरी कांदा उत्पादक आजही तोट्यात विक्री करीत असल्याने अनुदानाची अपेक्षा आहे. ५५ मालगाडीने हा कांदा निर्यात करण्यात आला आहे.योग्य बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढरेल्वेकडून प्रति मालगाडी ४० लाख रूपये भाडे आकारले गेले आहे. उन्हाळ कांद्याचे उत्पादन १३० टक्के झाले आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशासह जागतिक बाजारपेठेत कांद्याची मागणी घसरली. कांद्याचे बाजार भाव एक हजार रु पयांच्या आत येत सरासरी ५०० ते ६०० रु पये प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. त्यातच बांगलादेशातून वाढलेल्या मागणीमुळे जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, निफाड, खेरवाडी आणि नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावरून बांगलादेशाला कांद्याची निर्यात करण्यात आली आहे.
बांगला देशात कांद्याची निर्यात केल्याने रेल्वे झाली मालामाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 8:50 PM