सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावरील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकत तीन महिलांसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. घोटी महामार्गावरील भाटवाडी शिवारातील हॉटेल निसर्ग याठिकाणी अनैतिक देहविक्री व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना गुप्तपणे मिळाल्याने पोलिसांनी छापा टाकून येथील अनैतिक व्यापाराचा पर्दाफाश केला आहे.भाटवाडी शिवारातील निसर्ग हॉटेलवर महिलांकडून अनैतिक व्यापार करवून घेत मिळालेल्या पैशातून हॉटेलचालक उदरनिर्वाह करत असल्याचे पोलीस नाईक सारिका शिंदे (३९) यांना कळताच त्यांनी याबाबत सिन्नर पोलिसांत कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी हॉटेलवर छापा टाकला. यावेळी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर छुप्या पद्धतीने बनविण्यात आलेल्या दरवाजाने वर गेल्यावर तेथे तीन पीडित महिला आढळून आल्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून इतरांशी अनैतिक संबंध बनवून काही पैसे दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रकरणी पोलिसांनी हॉटेलचालक रामनाथ एकनाथ कांडेकर (५१, रा. कानडी मळा), भाऊ मोहन गुंजाळ (३४, रा. ठाणगाव, सिन्नर), सागर गुरुमुखदास जिवाजी (२९, रा. श्रीरामपूर), अशोक बाबूराव खुळे (४५, रा. वडांगळी, सिन्नर) या संशयितांना अटक केली असून, स्त्रिया व मुली यांच्या अनैतिक व्यापाराबाबत प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनैतिक देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश; चौकडी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 8:41 PM
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावरील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकत तीन महिलांसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. घोटी महामार्गावरील भाटवाडी शिवारातील हॉटेल निसर्ग याठिकाणी अनैतिक देहविक्री व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना गुप्तपणे मिळाल्याने पोलिसांनी छापा टाकून येथील अनैतिक व्यापाराचा पर्दाफाश केला आहे.
ठळक मुद्देअनैतिक व्यापाराबाबत प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल