लोहोणेर : नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात कोरोना सदृश आजारावर उपचार घेत असलेल्या येथील ७५ वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने लोहोणेर गावात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. येथील शेती व्यवसाय असलेल्या व्यक्तीस कोरोनाची लक्षण जाणवू लागण्याने त्यास नाशिक जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असतानाच गुरुवारी (दि.१) सकाळी सदर व्यक्तीचे निधन झाले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.लोहोणेर गावात सध्या कोरोना सदृश आजाराच्या रु ग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या पाच महिन्यात कोणताही रु ग्ण नसतांना आज एक वर्षाच्या लहान बालका सह सहा व्यक्तींचे अहवाल पॉझििटव्ह आले असल्याने आता ही संख्या ४५ वर जाऊन पोहचली आहे. यामुळे लोहोणेर गावात कोरोना बाबत भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे कोरोनाच्या रु ग्ण संख्येत वाढ होत असतांनाही काही महाभाग मात्र कोणतीही काळजी घेत नसून जाणीवपूर्वक विना मास्क बिनधास्तपणे गावात रिकामटेकडे फिरत असतात. प्रशासनाने यांना आवर घालणे गरजेचे आहे. तर प्रशासनाचे वतीने गेल्या २८ तारखेपासून पाच दिवसासाठी जनता कर्फ्यु जाहीर केल्या नंतरही ठराविक अपवाद वगळता काही दुकानदारानी आपली दुकाने चालू ठेवण्यातच धन्यता मानली. यामुळे जनता कर्फ्युला काहींनी जाणीव पूर्वक हरताळ फसल्याचे चित्र लोहोणेर गावात पहावयास मिळाले. एकंदरीत कोरोना बाबत कोणालाही गांभीर्य नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.कोरोना सदृश आजाराची प्राथमिक लक्षणे जाणवत असल्यास आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. तोंडाला मास्क लावावे, सॅनिटायझरचा वापर करावा. सोशल डिस्टक्शन पाळावे. कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये आपण आपली व कुटुंबातील व्यक्तीची काळजी घ्यावी. विनाकारण बाहेर फिरू नये.- डॉ. सुभाष मांडगे, तालुका आरोग्य अधिकारी, देवळा.
लोहोणेर गावात कोरोना बाबत भीती व्यक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 3:10 PM
लोहोणेर : नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात कोरोना सदृश आजारावर उपचार घेत असलेल्या येथील ७५ वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने लोहोणेर गावात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. येथील शेती व्यवसाय असलेल्या व्यक्तीस कोरोनाची लक्षण जाणवू लागण्याने त्यास नाशिक जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असतानाच गुरुवारी (दि.१) सकाळी सदर व्यक्तीचे निधन झाले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
ठळक मुद्देजनता कर्फ्यु जाहीर केल्या नंतरही काही दुकानदाराने सुरुच