नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे शिष्यवृत्ती अर्जभरण्याची प्रक्रिया सध्या महा डी बी टी संकेतस्थळावर सुरू आहे. परंतु हे अर्ज भरण्याची अंतिम मुदत बुधवारी (दि. ३१) संपणार असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरतांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी निर्धारित वेळेत अर्ज सदर करू शकणार नसल्याने हे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याना मुदत वाढ मिळावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत संपत आली आहे. मात्र बी ए एम एस विद्याशाखेच्या प्रथम व द्वितीय वर्षाचे निकाल हे २४ मार्च रोजीrजाहीर झाले. त्यामुळे उर्वरित ७ दिवसात अर्ज भरणे, यातील अनेक विद्यार्थ्यांना शक्य होऊ शकले नाही, तसेच कोरोनामुळे विविध शैक्षणिक कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत असून शिष्यवृत्ती अर्ज भरतांना विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामूळे बहुतांश विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्याचे नुमुड करीत अभाविप तर्फे समाज कल्याण नाशिक विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांना निवेदन दिले. यावेळी अभविपचे महानगर सहमंत्री ओम मालुंजकर, सिडको नगर सहमंत्री कौस्तुभ पिले, नाशिक जिल्हा आयाम, गतीविधी व कार्य राकेश साळुंखे, पंचवटी नगर सहमंत्री देवेश चिंचाळकर, मयूर फड आदी उपस्थित होते.
===Photopath===
300321\30nsk_17_30032021_13.jpg
===Caption===
समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांना निवेदन देताना अभविपचे ओम मालुंजकर, कौस्तुभ पिले, राकेश साळुंखे, पंचवटी नगर सहमंत्री देवेश चिंचाळकर, मयूर फड आदी