खेडलेझुंगे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत द्राक्ष, मोसंबी, केळी, संत्री, काजू डाळिंब आणि आंबा आदी फळपिकांचा समावेश आहे. द्राक्षे, केळी व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना योजनेतील सहभागासाठी ७ नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु, परतीच्या पावसामुळे द्राक्षांसह डाळींब पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने सदर योजनेची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे. त्यामुळे द्राक्ष व डाळींब उत्पादकांमध्ये मोठ्याप्रमाणावर नाराजगी व्यक्त केली जात आहे.मका, सोयाबीन पीकांसंदर्भात काढलेल्या विमा संरक्षणाची रक्कम मिळण्यासाठी आणि पंचनाम्यात अडकलेले शेतकरी या वर्षी विमा काढण्यापासुन वंचित राहणार असल्याचे चिन्ह निर्माण झालेले आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. आधीच सदरच्या विम्याबाबतची माहिती आणि मार्गदर्शक सुचना शासनाकडुन एक महिना उशिराने देण्यात आल्या. त्यातच विम्याचे संरक्षण असलेल्या कालावधीत परतीच्या पावसाने फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. सध्या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात ग्रामविकास विभाग, महसुल विभाग, कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी आणि शेतकरीवर्ग गुंतलेला आहे. त्यामुळे विमा काढण्यासाठी मागीलप्रमाणे शेतकरी प्रोत्साहीत झाल्याचे दिसुन येत नाही. द्राक्ष बागांच्या विमा काढण्यासाठी ७ नोव्हेंबर २०१९ ही शेवटची तारीख होती परंतु शेतकरी वर्गास याची माहीती ऐनवेळेस मिळाल्याने आणि ब-याच ठिकाणी इंटरनेट, विज व साईटच्या अडचणी असल्याने शेतकरी त्यापासून वंचित राहीलेले आहेत. त्यामुळे द्राक्ष पिकासाठी विमा योजनेची मुदत वाढविण्याची मागणी शेतक-यांकडून होत आहे.सरकारकडून एक महिन्याचा विलंबपंतप्रधान पीकविमा योजनेची यंदाची मार्गदर्शक सूचना जारी करण्यास सरकारकडून एक महिन्याचा विलंब झाला आहे. त्यामुळे विम्याचे संरक्षण असलेल्या कालावधीत अवकाळी पावसाने फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्याचा रोष शेतक-यांमध्ये आहे. त्यातच योजनेतील सहभागाची मुदत वाढविण्याची मागणी द्राक्ष उत्पादकांनी करु नही ती न वाढविल्याने योजनेतील शेतक-यांच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह तयार झाले आहे. द्राक्ष पिकासाठी मुदत वाढ होणे गरजेचे आहे.- विलास गिते, द्राक्ष बागायतदार, खेडलेझुंगे.
द्राक्ष पिकासाठी विमा योजनेची मुदत वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 6:17 PM
शेतकऱ्यांची मागणी : ७ नोव्हेंबरला संपली मुदत
ठळक मुद्देमका, सोयाबीन पीकांसंदर्भात काढलेल्या विमा संरक्षणाची रक्कम मिळण्यासाठी आणि पंचनाम्यात अडकलेले शेतकरी या वर्षी विमा काढण्यापासुन वंचित राहणार असल्याचे चिन्ह निर्माण झालेले आहे.