लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य परिवहन महामंडळाकहून सामाजातील ३४ विविध प्रकारच्या घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाचे पास दिले जातात. संबंधित घटकांना सवलतीच्या प्रवासभाड्यासाठी ‘स्मार्ट कार्ड योजना’ लागू करण्यात आलेली आहे. तथापि काही अपरिहार्य कारणांमुळे स्मार्ट कार्डसाठी नोंदणी झालेली नाही. त्यामुळे स्मार्ट कार्डांचे वितरणदेखील लांबणीवर पडले आहे. त्यामुळे या योजनेला ३१ मार्चअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. यासाठी ३१ डिसेंबरअखेरची मुदत देण्यात आली होती. मात्र निर्धारित मुदतीत प्रवाशांनी अपेक्षित नोंदणी नोंदविलेली नसल्याने या योजनेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी १ मार्च २०२० पर्यंत नोंदणीकला, तर ३१ मार्च २०२० पर्यंत स्मार्ट कार्ड प्राप्त करून घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. याचाच अर्थ दि. ३१ मार्च २०२० पयंत स्मार्ट कार्ड घेतल्यास पात्र लाभार्थी प्रवासभाडे, सवलतीपासून ते एप्रिलनंतर वंचित राहणार नसल्याचे म्हटले आहे. मासिक तसेच त्रैमासिक पासधारकांचे स्मार्टकार्ड नोंदणीकरण १५ जानेवरीपर्यंत पूर्ण करण्यात यावे, जेणे करून पासधारकांना दि. १५पर्यंत पूर्ण करण्यात यावे जेणेकरून सदर पासधारकांना दि. १५ फेब्रुवारीपर्यंत स्मार्ट कार्ड वितरित करता येणे शक्य होणार आहे. दि. १५ फेबुवारीपासून या पासधारकांसाठी स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात आलेले आहे. प्रचलित कार्यपद्धतीनुसार पास घेतला असेल, परंतु ज्यांची मुदत दि. १५/२/२०२० पासून या पासधारकांसाठी मॅन्युअल कार्यपद्धतीनुसार करण्यात येत आहे. ज्यांची मुदत १५ फेब्रुवारीनंतर संपणार आहे या पासधारकांना त्यांच्या पासाची मुदत संपेपर्यंत प्रचलित पासवर कार्यपद्धतीनुसार प्रवास करता येणार आहे.विविध घटकांसाठी असलेली मुदतसामाजिक घटक स्मार्ट कार्डकरिता दिनांकज्येष्ठ नागरिक विभागीय कार्यालयात ०१ एप्रिल २०२०देण्यात येणारे पासेसमासिक/त्रैमासिक पास १५ फे्रबुवारी २०२०आवडेल तेथे प्रवास ०१ एप्रिल २०२०विद्यार्थी पासेस ०१ जून २०२०दिव्यांग प्रचलित कार्यपद्धती कायम असेल.
एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 1:16 AM
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाकहून सामाजातील ३४ विविध प्रकारच्या घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाचे पास दिले जातात. संबंधित घटकांना सवलतीच्या प्रवासभाड्यासाठी ‘स्मार्ट कार्ड योजना’ लागू करण्यात आलेली आहे. तथापि काही अपरिहार्य कारणांमुळे स्मार्ट कार्डसाठी नोंदणी झालेली नाही. त्यामुळे स्मार्ट कार्डांचे वितरणदेखील लांबणीवर पडले आहे. त्यामुळे या योजनेला ३१ मार्चअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
ठळक मुद्देफेब्रुवारीपासून अनिवार्य : मार्चअखेर नोंदणीची मुदत