मालेगाव : प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रतीक्षा म्हणजे ‘ड’ यादीत नावे समाविष्ट करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. आॅगस्ट २०१८ अखेर ग्रामसभेत इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी ‘ड’ यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी आपले नाव नोंद करावे असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सुर्यवंशी, उपसभापती अनिल तेजा, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांनी केले आहे.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबाना घरकुलांचा लाभ देता येतो. यासाठी सन २०११-१२ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षणाचा आधार घेण्यात येत आहे. यास्तव शासनामार्फत प्राधान्यक्रम यादी प्राप्त झाली होती. या आधारे त्या यादीमधील कुटुंबांना घरकुलाचा लाभ दिला जातो. परंतु या यादी बाहेरील बरीच कुटुंबे पात्र असूनही त्यांचे यादीत नाव नसल्याने घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. त्या अनुषंगाने शासनाने अशा कुटुंबांची नोंदणी ‘ड’ यादीमध्ये संबधित ग्रामपंचायतीकडे करून त्यांचे सर्वेक्षण करून पात्र कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार होत ‘ड’ नोंदणीसाठी या पूर्वी दिलेला कालावधी वाढवण्यात आला असून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आॅगस्ट २०१८ अखेर होणाऱ्या ग्रामसभेपर्यंत संबंधीत ग्रामपंचायतमधील इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी ‘ड’ यादीमध्ये नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
घरकुल योजनेच्या ‘ड’ यादीला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 6:38 PM