नाशिक : पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेचे अर्ज दाखल करण्याची मुदत ३० मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे विलंब शुल्कापोटी रक्कम वाचणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.विद्यापीठाच्या विधी शाखेचा निकाल १४ मे रोजी लागला आणि अतिरिक्त शुल्कासह अंदाजपत्रक भरण्याची १५ मे शेवटची तारीख आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यास मुदत मिळावी व अतिरिक्त शुल्क माफ करण्यात यावे अन्यथा तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल, असे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या सचिव पवार यांना निवेदन दिले. त्यावर पवार यांनी त्याच्यावर त्वरित विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी बोलणे करून फॉर्म भरण्याची तारीख ही ३० मे अशी वाढवली आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे विलंब शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे आता सर्व विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान टळणार आहे व त्याचबरोबर ज्यांनी अतिरिक्त शुल्क भरले असतील त्यांनादेखील ते परत देणार आहे, असे सांगण्यात आले.यावेळी अॅड. अंजिक्य गिते, वैभव वाकचौरे, गौरव उगले, प्रतीक खराटे, अंकित वाघ, सिद्धेश लांघी, संकेत मुठाळ, प्रथमेश पिंगळे आदी उपस्थित होते.
विधी अर्ज भरण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:51 AM