नाशिक: मखमलाबाद-म्हसरुळ लिंकरोडवरील भाजी बाजारात विक्रेते आणि ग्राहकांकडून मास्क वापराकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात भाजी बाजार भरतो. परिरसरातील रहिवासी तसेच दैनंदिन कामगार परततांना भाजी बाजारात थांबतात. मात्र अनेक ग्राहक मास्क वापरत नसल्याचे दिसते.
आरटीओ कॉर्नर सिग्नल बंद
नाशिक: पेठरोडवरील आरटीओ कॉर्नर येथील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने चाौकात वाहनांची कोंडी होत आहे. या मार्गावरून अवजड वाहतूक सातत्याने सुरू असते. बाजार समितीचा मार्ग असल्याने देखील वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे येथील सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी होत आहे. बंद सिग्नलमुळे अनेकदा चौकात वाहतूक कोंडी होत असते.
रस्तोरस्ती गूळ विक्रीची दुकाने
नाशिक: मखमलाबाद ते पेठरोड लिंकरोड मार्गावर ठिकठिकाणी ताडीपासून बनविलेला गुळ विक्रीसाठी परराज्यातील विक्रते दाखल झाले आहेत. आरोग्यासाठी ताडीचा गुळ गुणकारी असल्याचे सांगत गुळ विक्री केली जात आहे. नाशिककरांकडून देखील या गुळाला चांगली मागणी होतांना दिसते.
फुलेनगर रस्त्यावर वाढला भाजीबाजार
नाशिक: पंचवटीतील फुलेनगर येथील रस्त्यावर भाजीबाजार दिवसेदिवस वाढतच आहे. या मार्गावर सुरूवातील ठराविक विक्रेत्यांची दुकाने दिसत होती. परंतु आता बाजाराचा विस्तार वाढतांना दिसत आहे. रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्रेत्यांची दुकाने थाटली आहेत. भाजी बाजारामुळे या मार्गावरील वाहतुकीस अडथळा होत आ हे.
बेकायदा वृक्ष तोडीचा प्रकार
नाशिक: शहरातील अनेक भागात बेकायदेशीर वृक्ष तोडीचे प्रकार घडले आहेत. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता घराजवळील तसेच मनपाच्या उद्यानातील झाडे तोडली जात आहेत. मनपाकडे याबाबतची तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने वृक्षतोड करणाऱ्यांचे फावले आहे.
चिंचेच्या झाडांची तोडणी संशयास्पद
नाशिक: शंकरनगर ते टाकळी पूल या मार्गावर अनेक ठिकाणी चिंचेची झाडे आहेत. या झाडांचा ताबा काही मजुरांनी घेतला आ हे. येथील झाडांच्या चिंचा तोडण्यासाठी आदिवासी भागातून मजूर दररोज हजेरी लावत असून कोणतीही परवानगी न घेता चिंंचा तोडल्या जात आहेत.
सनातन ज्ञानामृत फाऊंडेशनतर्फे शिबिर
नाशिक: सनातन विद्या फाऊंडेशनच्यावतीने पंचवटीतील गोपाळ मंगल कार्यालय ज्ञानामृत शिबिर संपन्न झाले. फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संजय रत्नाकर, भुषण रत्नाकर गुरूजी, शिवप्रसाद शास्त्री उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता पसायदान व वैदिक मंत्राने घेतली. सुत्रसंचालन ऋग्वेद काळे यांनी केले.