नाशिक : अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी महापालिकेने अभय योजना आखलेली असून, या योजनेस दि. २१ नोव्हेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. महापालिकेने दि. ७ सप्टेंबर ते २१ आॅक्टोबर या कालावधीसाठी नळजोडणी नियमित करण्यासाठी अभय योजना लागू केली होती. परंतु, या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला मात्र, मुदत संपण्याच्या वेळेस अर्जदारांची गर्दी वाढल्याने नळजोडणी नियमितीकरणासाठी दि. २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभय योजनेंतर्गत अनधिकृत नळजोडणीधारकांनी मनपाचे नळजोडणीचे नियमित चार्जेस भरण्याबरोबरच दंडाची रक्कम भरायची आहे. त्यानंतर नळजोडणी नियमित केली जाणार आहे. मुदतीत नळजोडणी नियमित करून न घेणाºया नळजोडणीधारकांचा पाणीपुरवठा खंडित करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
‘नळजोडणी’च्या अभय योजनेस मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:13 AM