नाशिक : समाज कल्याण विभागात जात पडताळणीसाठी हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित असून गेल्या काही दहा ते १५ दिवसांपासून जात पडताळणी कार्यालयात लागणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रांगा अजूनही कायम आहे. विद्यार्थ्यांना वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने विविध विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (महासीईटी) विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तंत्र व व्यावसायिक शिक्षण प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना मुदत संपूर्णही समाज जातपडताळणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे विविध विद्यार्थी संघटनानी आंदोलनात्मक पवित्रा घेत प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत वाढ देण्याची मागणी केली होती. खासदार हेमंत गोडसे यांनीही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे मनसेच्या उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शनिवारी (दि.१६) आंदोलन करून विद्यार्थ्यांना तत्काळ जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या अडचणीची अखेर महासीईटीने दखल घेतली असून, जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे.
इन्फो-
समाज कल्याणचा भोंगळ कारभार
जातपडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी तीन ते चार महिन्यांपूर्वी अर्ज सादर केले आहे. अर्ज स्वीकारतानाच जातपडताळणी विभागाने आवश्यक कागदपत्र व पुरावे तपासून घेतले होते. त्यानंतरही या प्रकरणांमध्ये त्रुटी काढल्या जात आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी त्रुटींचे निराकरणही केल्यानंतरही त्रुटी काढण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
इन्फो-
टाळे ठोकण्याचा इशारा
विद्यार्थ्यांना वेळेत जातपडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शनिवारी (दि.१६) आंदोलन करण्यात केले. जात पडताळणी पमाणपत्र तत्काळ मिळावे, तसेच ते सादर करण्यासाठी मुतदवाढही देण्यात यावी, अन्यथा समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही मनसेतर्फे देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष मनोज घोडके महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष, कौशल पाटील प्रदेश सदस्य, उमेश भोई, शशी चौधरी बाजीराव मते, सौरव सोनवणे विभाग अध्यक्ष नितीन धानपुणे, अमोल भालेराव, सागर दानी आदी उपस्थित होते .
(फोटो-१६ पीएचडीसी ८८ ) जातपडताळणीसाठी समाज कल्याण कार्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी.
(फोटो-१६ पीएचडीसी९१) - समाज कल्याण विभागात आंदोलन करताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष मनोज घोडके, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कौशल पाटील, प्रदेश सदस्य उमेश भोई, शशी चौधरी, बाजीराव मते.