इंदिरानगर : जनावरांच्या गोठ्यातून मलमूत्र घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून रस्त्यावर मलमूत्र सांडत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे .वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यातून दररोज मलमूत्र घेऊन जाणारे ट्रक वडाळागाव चौफुली, वडाळा-पाथर्डी रस्ता या मार्गाने ये-जा करीत असताना या वाहनातून रस्त्यावर मलमूत्र पडत असल्यामुळे रस्त्यालगत राहणाºया नागरिकांचे आणि मार्गक्र मण करणाºया वाहनधारकांना घाण व दुर्गंधीचा त्रास होतो तसेच त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला झाला आहे. तातडीने मनपाच्या आरोग्य विभागाने मलमूत्र घेऊन जाणाºया वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.रस्त्यावर सांडल्या जाणाºया जनावरांच्या मलमूत्रामुळे पादचाºयांना आणि वाहनधारकांना नाक दाबून मार्गक्र मण करावे लागते. तसेच या मल-मूत्रामुळे दुचाकी वाहने घसरून लहान-मोठे अपघातही घडत आहेत.
गोठ्यातील मलमूत्र रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 12:24 AM
इंदिरानगर : जनावरांच्या गोठ्यातून मलमूत्र घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून रस्त्यावर मलमूत्र सांडत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे .
ठळक मुद्देआरोग्यास धोका : वाहनधारक, परिसरातील नागरिक त्रस्त