लोकमत न्यूज नेटवर्कखामखेडा : नामपुर-सटाणा-पिपळदर-खामखेडा -कळवण-नाशिक या राज्य महामार्ग १७ असून सदर रस्त्यावरील पिपळदर ते मागबारी घाट, खामखेडा ते बेज या रस्त्यावर ठिकठिकाणी डांबर उखडलेले आहे. तसेच काटेरी बाभळ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण केल्याने सदर रस्त्यावर वाहन चालविणे अवघड झाले आहे. ही रस्त्यात येणारी झाडे तोडून रस्त्या दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकानी केली आहे.कळवण-सटाणा हा राज्य महामार्ग क्र मांक सतरा नंबरचा हायवे आहे. हा रस्ता नाशिकला व नांदुरी गडावर जाण्यासाठी जवळचा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.दर वर्षी या रस्त्याची डागडुजी करताना फक्त मोठी खड्डे बुजण्यात येतात. लहान खडे तसेच असतात. तसेच सटाणा पिपळदर -खामखेडा-पिळकोस- बेज-कळवण या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी बाभळी वाढल्या असल्याने वळण रस्त्यावरील समोरून येणार वाहन दिसत नसल्याने नेहमी अपघात होतात. या घाटातून वाहने चालविताना वाहन धारकाला कसरत करावे लागते. अनेक वेळा हे घाटातून प्रवास करताना रस्त्यातील खडे टाळण्याच्या नदात नेहमी लहान -मोठ्या स्वरूपाचे अपघात होतात.या रस्त्यावरील साइड पटया अनेक ठिकाणी रस्त्यापेक्षा खोल झाल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेच्या शेतकर्यांनी रस्त्यावर अतिक्र मण केल्याने रस्त्याच्या कडेच्या गटारी जमीनदोस्त झाल्या आहेत. यामुळे रस्ता अरुंद होऊ लागला आहे. या महामार्गावरील अनेक ठिकाणी सुचनादर्शक, दिशादर्शक व आंतरदर्शक फलकाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.काही ठिकाणी तर दिशादर्शक फलक नाहीत. आणि जे काही आहेत त्यावरील जाहित कंपन्यांनी आतिक्र मण केले आहे. त्यामुळे अन्य गावच्या वाहनचालक दिशाहीन होतात.तसेच ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेच्या काटेरी बाभळी वाढलेल्या असून रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कच्या रस्त्यावर गवत वाढलेले असून त्यामुळे अपधात होत असतात. तसेच रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या काटेरी बाभळी डांबरी रस्त्यावर आली असल्याने रस्ता अरु ंद झाल्याने दोन वाहने पास करताना वाहन चालका मोठी कसरत कारावे लागते.
रस्त्यावर काटेरी बाबळीचे अतिक्र मण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 6:26 PM
खामखेडा : नामपुर-सटाणा-पिपळदर-खामखेडा -कळवण-नाशिक या राज्य महामार्ग १७ असून सदर रस्त्यावरील पिपळदर ते मागबारी घाट, खामखेडा ते बेज या रस्त्यावर ठिकठिकाणी डांबर उखडलेले आहे. तसेच काटेरी बाभळ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण केल्याने सदर रस्त्यावर वाहन चालविणे अवघड झाले आहे.
ठळक मुद्देया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.