शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

सुनसान जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी शिरतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:38 AM

महसूल कर्मचाºयांचा संप सुरू असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांचा शुकशुकाट असताना सकाळी ११ वाजता अचानक तिघे अतिरेकी गोळीबार करीत शिरले व तिघा कर्मचाºयांना डांबून ठेवत टाइमबॉम्ब ठेवतात आणि सुरू होते पोलिसांची धावपळ... सशस्त्र पोलीस व अतिरेक्यांमध्ये चकमक झडून सुमारे दीड तासानंतर तिघांना जेरबंद करण्यात पोलीस यशस्वी होतात.

नाशिक : महसूल कर्मचाºयांचा संप सुरू असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांचा शुकशुकाट असताना सकाळी ११ वाजता अचानक तिघे अतिरेकी गोळीबार करीत शिरले व तिघा कर्मचाºयांना डांबून ठेवत टाइमबॉम्ब ठेवतात आणि सुरू होते पोलिसांची धावपळ... सशस्त्र पोलीस व अतिरेक्यांमध्ये चकमक झडून सुमारे दीड तासानंतर तिघांना जेरबंद करण्यात पोलीस यशस्वी होतात. अर्थातच यातील एकही गोष्ट खरी नाही, ही पोलीस, अग्निशामक, आरोग्य खात्याची रंगीत तालीम होती.संयुक्त राष्ट्र संघाने १३ आॅक्टोबर हा दिवस राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन दिवस म्हणून जाहीर केला असून, त्या अनुषंगाने आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात रंगीत तालीम घेण्यात आली. अकरा वाजता अतिरेकी शिरल्याचा निरोप निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मिळताच त्यांनी तत्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांना त्याची सूचना दिली. कार्यालय सोडून सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले. तीन अतिरेकी कार्यालयात गोळीबार करीत शिरले व त्यांनी तिघांना बंधक केल्याचेही सांगण्यात आले. अवघ्या तीन मिनिटात सर्वजण कार्यालय सोडून बाहेर पडले. आपत्ती व्यवस्थापन, दहशतवाद विरोधी पथक, शिघ्र कृती दलाचे अधिकारी व कर्मचारी व कमांडोनी इमारतीस घेरले व त्यांनी तिघा दहशतवाद्यांना ठार करून तिन्ही बंधकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. बॉम्ब शोध पथकाने प्रवेशद्वाराजवळ दडवून ठेवलेला बॉम्ब शोधक पथकाच्या सहाय्याने शोधून तो सुरक्षित स्थळी जाऊन निकामी केला. १२ वाजून २४ मिनिटांनी सर्व अधिकारी व कर्मचाºयांना सायरन वाजवून आॅल क्लिअरचा संदेश दिला. सदरच्या रंगीत तालमीत जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, अतुल जगताप, देशमुख, नीळकंठ दुसाने, अमृत पाटील, शरद घोरपडे आदी उपस्थित होते.