येथील शासकीय विश्रामगृहात नगरसेवक एजाज बेग यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्लास्टिक कारखानदारांनी कृषी मंत्री भुसे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. एजाज बेग यांच्यासह प्लास्टिक कारखानदारांनी त्यांच्या समस्या मांडल्या. चर्चेत प्लास्टिक कारखानदार अल्ताफ बेग, युनूस मुल्ला, शफीकउल्लाभाई हॉटेलवाले, जमीलभाई प्लास्टिकवाले, सिराज आलम, जिया शेख अल्लाउद्दीन, निहाल चक्कीवाले, आदी सहभागी झाले होते. शहरातील प्लास्टिक कारखाने शहराबाहेर स्थलांतरित करण्याबाबतचे नाहरकत पत्र मिळणे, प्लास्टिक उद्योगाऐवजी इतर उद्योगास मनपाकडून परवानगी मिळणे, कारखाने स्थलांतरित करण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ मिळणे आदी समस्यांसह महावितरणकडून वाढीव वीज बिले मिळत असल्याबाबत तक्रार करण्यात आली.
इन्फो
एकाच भूखंडावर थाटा उद्योग
दादा भुसे म्हणाले, सर्व प्लास्टिक कारखानदारांनी एकत्र येत शहराबाहेर खासगी जागेत एक भूखंड घेऊन एकाच ठिकाणी कारखाने उभारल्यास सर्वांना सोईचे होईल. शिवाय शासनाकडून सुविधा पुरविणे सोपे जाईल. याशिवाय कारखानदारांना चाळीसगाव फाटा, सायने, औद्योगिक वसाहत येथे कारखाने टाकण्यास मदत केली जाईल. अजंग येथील औद्योगिक वसाहतीत प्लास्टिक कारखानदारांसाठी जागा राखून ठेवण्यात येईल. कारखाने स्थलांतरित मुदतवाढ मिळवून देण्याचे प्रयत्न करू, असेही त्यांनी शेवटी सांगितले.