नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून नांदूरशिंगोटे भागात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रभाव अधिक जाणवत असल्याने कोरोना रु ग्णांच्या चाचणीसाठी ग्रामीणस्तरावरील जिल्ह्यातील पहिले स्वॅब संकलन केंद्र सुरु करण्यात येत असल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती शोभा बर्के यांनी दिली.दापुर प्राथमिक आरोग्य केंद्र व नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत यांच्यावतीने सोमवारपासून (दि.५) तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे राबविण्यात येत आहे. सिन्नर शहरासह तालुक्यातील कोरोना रु ग्णांच्या चाचणीसाठी ग्रामीण उपजिल्हा रु ग्णालयात डेडिकेटेट कोविड केअर सेंटर व रतन इंडिया प्रकल्पाच्या आवारात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी शहरासह तालुक्यातील रु ग्णांची चाचणी केली जाते. तथापि गेल्या काही दिवसांमध्ये रु ग्णसंख्येत भरमसाठ वाढ होत असून प्रामुख्याने ग्रामीण भागात अधिक प्रमाण आहे. या दोन्ही सेंटरमध्ये कर्मचारी संख्या मर्यादित असल्याने चाचण्यांसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ येते. तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याने या भागात कोरोना चाचणीसाठी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे होते.कोरोनाचे लवकर निदान होणे आवश्यक आहे. जेणेकरून आजाराचा प्रसार थांबविणे शक्य होणार आहे. त्यासाठी पंचायत समितीच्या सभापती बर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नितीन म्हस्के, सरपंच गोपाल शेळके यांनी पाठपुरावा केला होता.या परिस्थितीचा विचार करु न आरोग्य विभाग पंचायत समिती सिन्नर, प्राथमिक आरोग्य केंद्र दापुर व ग्रामपंचायत नांदूरशिंगोटे यांच्या संयुक्त विद्यमाने नांदूरशिंगोटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारपासून (दि.५) ते बुधवार (दि. ७) पर्यंत स्वॅब संकलन केंद्र सुरू करण्यात येत आहे. तपासणीसाठी सकाळी ९ ते ११ या कालावधीत नावनोंदणी करता येणार आहे.ताप, तीव्र घसादुखी, सर्दी, खोकला, वास न येण, चव न समजणे, अतिजास्त प्रमाणात थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, तीव्र अंगदुखी आदी लक्षणे असणाऱ्या रु ग्णांनी या स्वब संकलन केंद्रात येऊन तपासणी करु न घ्यावी असे आवाहन नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत व दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.
नांदूरशिंगोटेत स्वॅब संकलन केंद्राची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 5:31 PM
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून नांदूरशिंगोटे भागात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रभाव अधिक जाणवत असल्याने कोरोना रु ग्णांच्या चाचणीसाठी ग्रामीणस्तरावरील जिल्ह्यातील पहिले स्वॅब संकलन केंद्र सुरु करण्यात येत असल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती शोभा बर्के यांनी दिली.
ठळक मुद्देसोमवारपासून (दि.५) तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे राबविण्यात येत आहे