नाशिक : इंडोनेशियातील एका मंदिरात काही मुस्लीम मुली गणपतीच्या मूर्तीसमोर उभे राहून प्रार्थना करत होत्या. याबाबत आपण एका शिक्षिकेला विचारले असता, त्यांनी सांगितले की, आमचा धर्म मुस्लीम असला तरी आमची संस्कृती हिंदू असल्याचे सांगितले. इंडोनेशियात असे आपल्या संस्कृतीचे अनेक दाखले मिळाल्याचे ‘इंडोनेशायण’चे लेखक रवी वाळेकर यांनी सांगितले.‘कंबोडायण’ पुस्तकाच्या प्रतिसादानंतर लेखक रवी वाळेकर यांनी इंडोनेशियाच्या विविध रंगी विविध ढंगी देशाचे मिश्किल शैलीतील प्रवासवर्णन केलेल्या ‘इंडोनेशायण’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. कुसुमाग्रज स्मारक येथील ‘स्वगत’ नाट्य दालनात झालेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी त्यांची मुलाखत श्याम पाडेकर आणि विनायक रानडे यांनी घेतली.यावेळी बोलताना वाळेकर यांनी ‘कंबोडायण’ लिहतांना ज्याप्रमाणे आपले पुस्तक वाचून काही नागरिकांनी तरी कंबोडियात जावे, अशी इच्छा होती. त्याप्रमाणेच हे पुस्तक वाचूनदेखील अनेकांना इंडोनेशियात जाऊन तेथील संस्कृती पाहण्याची इच्छा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्तकेला. मृणाल कुलकर्णी यांनी वाळेकर यांच्याप्रमाणेच पुस्तके आणि इतिहासप्रेमी असल्याचे सांगितले. स्वामी मालिकेतील रमाच्या भूमिकेमुळे आजही लोक ओळखतात, असेही त्यांनी सांगितले.
‘त्यांनी’ संस्कृती कायम ठेवल्याचा प्रत्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:50 AM