शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’मध्ये फडकला तिरंगा

By admin | Published: June 30, 2015 12:23 AM

‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’मध्ये फडकला तिरंगा

  नाशिक : नऊ दिवसांचा कालावधी अन् ४८०० किलोमीटरची सातत्यपूर्ण सायकल स्पर्धा. अमेरिकेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कधी अत्यंत उष्ण, कधी अत्यंत थंड तर कधी वादळी वारा अन् पाऊस, डोंगरदऱ्यांमधून जाणार मार्ग, तीव्र चढ आणि तीव्र उतार अशा नैसर्गिक, भौगोलिक परिस्थितीचा सामना करत मोठ्या जिद्दीने नाशिकचे भूलतज्ज्ञ डॉ. हितेंद्र महाजन, दंतरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र महाजन या बंधूंनी भारतीय प्रमाण वेळेनुसार आठ दिवस अन् १४ तासांत रेस अ‍ॅक्रॉस (रॅम) स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करत देशाचा तिरंगा फडकविला. ‘टूर द फ्रान्स’ या सायकल रेस स्पर्धेपेक्षाही अत्यंत खडतर व अवघड समजली जाणारी ‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’ ही स्पर्धा गेल्या २० जूनपासून अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरातून सुरू झाली होती. ही स्पर्धा २९ जून रोजी संपली. स्पर्धेमध्ये सहभागी सायकलस्वारांना नऊ दिवसांमध्ये सुमारे चार हजार आठशे किलोमीटर अंतर कापण्याचे आव्हान होते. सायकलपटू महाजनबंधूंनी आत्मविश्वास, जिद्द व कठोर परिश्रम अन् सरावाच्या जोरावर यशस्वीपणे स्पर्धा पूर्ण केली. ही स्पर्धा पूर्ण करणारे हे प्रथम भारतीय स्पर्धक ठरले. तसेच यंदा आशिया खंडातून त्यांचा एकमेव सहभाग होता. अद्याप या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना ४८०० कि.मी.चे अंतर कापता आलेले नाही. स्पर्धेसाठी मिळालेल्या आर्थिक मदतीतून हे बंधू आदिवासी गरजूंवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आय ट्रान्सप्लांट करणार आहेत. एकूणच गरजूंचे अनारोग्य रोखण्यासाठी जास्तीत जास्त खर्च या डॉक्टर बंधूंक डून केला जाणार आहे.