चांदोरी : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील चेहडी, चितेगाव फाटा, चांदोरी चौफुली, सायखेडा फाटा, लाखलगाव, ओढा, माडसांगवी या ठिकाणी असलेल्या गतीरोधकांवरील पांढरे पट्टे आणि रेडीयम खराब झाल्याने वाहनचालकांना गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग गतिरोधकांची दुरु स्ती करणार की आणखी मोठ्या अपघाताची वाट पाहणार, असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.सहा वर्षांपूर्वी नाशिक-औरंगाबाद महामार्गाचे नूतनीकरण करण्यात आले होते. दुपदरी रस्ता चौपदरी करण्यात आला. दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारण्यात आले. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक टाकण्यात आले. त्यात शोभिवंत झाडे लावण्यात आली. चांदोरी ते चेहडीदरम्यानच्या दुभाजकामधील झाडांचीदेखील आता दुरवस्था झाली आहे. झाडांची छाटणी केल्यानंतर पाणी दिले जात नाही. गावाजवळ वाहनांचा वेग मंदावला जावा, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने गतिरोधक करण्यात आले होते; मात्र अनेक वर्षे या गतिरोधकांची डागडुजी झाली नसल्याने यावर रेखाटलेले पांढरे पट्टे आणि रेडियम निघून गेले आहे. त्यामुळे गतिरोधक असल्याचा कुठलाही अंदाज येत नसल्याने अनेकदा गाडी आदळते त्यामुळे अपघात होतात. यात अनेकजण जखमी, तर काहींचा मृत्यू झाला आहे. अनेकदा तक्र ार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग या गतिरोधकांची डागडुजी करून पांढरे पट्टे मारण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.लाखलगाव ते चांदोरीदरम्यान पाच ते सहा ठिकाणी गतिरोधक आहेत. या गतिरोधकांवरील पांढरे पट्टे आणि रेडियम निघून गेले आहे. वाहनचालकांना गतिरोधकांचा अंदाज येत नाही. गतिरोधकांजवळ रीफलेक्टर बसवून पांढरे पट्टे मारावेत.- सिद्धार्थ वनारसे, जिल्हा परिषदनाशिक -औरंगाबाद महामार्गावरील गतिरोधकांची असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. बांधकाम विभागाने गतिरोधकांजवळ पांढरे पट्टे मारावे. आवश्यक असेल तेथे गतिरोधक असल्याचे फलक लावावे.- नितीन खरात, वाहनधारक, चांदोरी दुभाजकामधील झाडांची पाण्याअभावी दुरवस्था झाली आहे. रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. दुभाजकामधील झाडांची छाटणी करू नये.- राहुल टर्ले, चांदोरी
नाशिक-औरंगाबात महामार्गावरील गतिरोधक ठरतायेत जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 11:00 PM
चांदोरी : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील चेहडी, चितेगाव फाटा, चांदोरी चौफुली, सायखेडा फाटा, लाखलगाव, ओढा, माडसांगवी या ठिकाणी असलेल्या गतीरोधकांवरील पांढरे पट्टे आणि रेडीयम खराब झाल्याने वाहनचालकांना गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग गतिरोधकांची दुरु स्ती करणार की आणखी मोठ्या अपघाताची वाट पाहणार, असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.
ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : रिफ्लेक्टर, पांढरे पट्टे गायब