शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

६६१ अपक्षांचा मेळा, निवडून आले सोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:37 AM

आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ असेल; पण कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती नसेल तर उमेदवाराची निवडणुकीमध्ये अडथळ्याची शर्यत पार करताना दमछाक होते. महाराष्ट स्थापनेपासून झालेल्या बारा विधानसभा निवडणुकांमध्ये नाशिक जिल्ह्यातून ६६१ उमेदवारांनी अपक्ष म्हणून नशीब अजमावले; परंतु त्यातील केवळ १६ उमेदवारांनाच विधानसभेची पायरी चढण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे.

नाशिक : आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ असेल; पण कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती नसेल तर उमेदवाराची निवडणुकीमध्ये अडथळ्याची शर्यत पार करताना दमछाक होते. महाराष्ट स्थापनेपासून झालेल्या बारा विधानसभा निवडणुकांमध्ये नाशिक जिल्ह्यातून ६६१ उमेदवारांनी अपक्ष म्हणून नशीब अजमावले; परंतु त्यातील केवळ १६ उमेदवारांनाच विधानसभेची पायरी चढण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे.महाराष्टची स्थापना झाल्यानंतर १९६२ मध्ये पहिल्या विधानसभा निवडणुकीत १२ मतदारसंघ अस्तित्वात होते. त्यात २३ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पहिल्या निवडणुकीत मात्र मतदारांनी अपक्षांकडे पाठ फिरवित सर्वच्या सर्व कॉँग्रेस उमेदवारांना कौल दिला. १९६७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अपक्षांची संख्या घटून १९वर आली होती. या निवडणुकीतही आठ ठिकाणी काँग्रेसला मतदारांनी पसंती दिली तर उर्वरित मतदारसंघात अन्य पक्षांचे उमेदवार निवडून आले होते. याहीवेळी मतदारांनी अपक्षांना नाकारले होते. १९७२मध्ये मात्र २३ अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आणि त्यात देवळालीतून निवृत्ती गायधनी, निफाडमधून दुलाजी पाटील, येवल्यातून निवृत्ती भोरकडे आणि चांदवडमधून जनार्धन आहेर या अपक्षांनी बाजी मारली. जिल्ह्यात अपक्ष म्हणून निवडून येण्याचा पराक्रम या चार उमेदवारांनी केला. १९७८मध्ये झालेल्या निवडणुकीतही ५० उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरले त्यापैकी पुन्हा एकदा चार अपक्ष निवडून आले. त्यात देवळालीतून बाबुलाल अहिरे, सिन्नरमधून सूर्यभान गडाख, येवल्यातून जनार्धन पाटील, तर नांदगावमधून कन्हय्यालाल नहार यांचा समावेश होता. १९८०च्या निवडणुकीत ४० अपक्षांमधून केवळ शांतारामबापू वावरे या एकमेव अपक्ष उमेदवाराने नाशिक मतदारसंघातून विजय संपादन करत विधानसभेत पाऊल ठेवले. १९८५च्या निवडणुकीत ८९, तर १९९०च्या निवडणुकीत ९९ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. परंतु, या दोन्ही निवडणुकीत अपक्षांना भोपळा फोडता आला नव्हता. १९९५ची निवडणूक सर्वाधिक चुरशीची झाली.या निवडणुकीत अपक्षांच्या संख्येने विक्रम केला. यावेळी ११८ उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यात सिन्नरमधून तुकाराम दिघोळे, सुरगाण्यातून हरिश्चंद्र चव्हाण, तर बागलाणमधून दिलीप बोरसे यांनी बाजी मारली. १९९९च्या निवडणुकीत ३२ अपक्ष रिंगणात होते. त्यात देवळालीतून बबन घोलप यांनी बाजी मारली.एकमेव अपक्षाला मंत्रिपदजिल्ह्यात आतापर्यंत गेल्या १२ निवडणुकांमध्ये १६ अपक्ष निवडून आले असले तरी अपक्ष असतानाही मंत्रिपदाचे भाग्य सिन्नरमधील तुकाराम दिघोळे यांच्या वाट्याला आले. युतीच्या सत्ताकाळात दिघोळे यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली होती. युतीच्या सत्ताकाळात मंत्रिपद उपभोगलेले बबन घोलप हे नंतर १९९९च्या निवडणुकीत एबी फॉर्मच्या तांत्रिक गोंधळामुळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले.दाभाडीमधून अगोदर अपक्ष म्हणून निवडून आलेले दादा भुसे नंतर शिवसेनेत दाखल झाले आणि सध्या ते राज्यमंत्री आहेत. सुरगाण्यातून अपक्ष म्हणून निवडून आलेले हरिश्चंद्र चव्हाण हे नंतर भाजपचे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले, मात्र केंद्रात मंत्रिपदाचे स्वप्नच राहिले.२००४च्या निवडणुकीत ३५ अपक्षांमधून दाभाडीतून दादा भुसे आणि बागलाणमधून संजय चव्हाण हे उमेदवार निवडून आले तर २००९ च्या निवडणुकीत ६८ अपक्षांमधून चांदवडमधून शिरीष कोतवाल यांनी विधानसभेत प्रवेश केला. मागील २०१४ च्या निवडणुकीत ६५ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. मात्र, मोदी लाटेत सेना-भाजप विरोधक होरपळून निघालेले असताना त्यात अपक्षांचाही टिकाव लागू शकला नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकElectionनिवडणूक