सटाणा : बागलाण तालुक्यातील दºहाणे गाव कागदोपत्री हागणदारीमुक्त दशर्वून ग्रामपंचायतीने शासकीय निधी मिळवला. त्यातून शौचालये बांधली. मात्र ती निकृष्ट दर्जाची असून, ती पडक्या स्थितीत असल्याने ग्रामस्थ शौचासाठी मोकळ्या भूखंडाचा वापर करीत असल्याचा आरोप गावातील रहिवासी जितेंद्र सूर्यवंशी यांनी केला आहे. चौदाव्या वित्त आयोगातून शौचालयासाठी निधी प्राप्त झाला असून, त्यातून सन २०१७ ते २०२० या कालावधीत प्रत्येक कुटुंबासाठी शौचालय बांधणे गरजेचे होते. त्यातून २०४ पैकी १०४ शौचालये बांधण्यात आली . सध्या या शौचालयांची अवस्था पडक्या स्वरूपात असून काही शौचालयांची दारे तर काही शौचालयातील भांडीच गायब झाली असल्याचे निदशर्नास आले आहे . गावातील रहिवासी जितेंद्र सूयर्वंशी यांनी घनकचरा व्यवस्थापन , शौचालय , पाणीपुरवठा , घरकुल आवास योजना व इतर विकास कामांवर वर्षनिहाय किती खर्च केला गेला याबाबत माहितीच्या अधिकारात मागणी केली होती .पंचायत समितीकडे अनेक वेळा तक्रार अर्ज केले होते . मात्र बनावट अभिलेखाद्वारे संबंधितांनी दिशाभूल केली असा सूयर्वंशी यांचा आरोप आहे . त्यांनी मागितलेली सर्व माहिती दिशाभूल करणारी असून सदर प्रकरणाची चौकशी त्रयस्थ यंत्रणेकडून करावी , अशी मागणी सूयर्वंशी यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे .