शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

सोशल मीडियावर बनावट अकाउंट; सायबर पोलिसांकडे वर्षाला २५० तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:10 AM

सायबर गुन्हेगारी पोलिसांसह नागरिकांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. ऑनलाइन फसवणूक असो किंवा अन्य प्रकारे सोशल मीडियावरील छळ असो, अशा माहिती ...

सायबर गुन्हेगारी पोलिसांसह नागरिकांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. ऑनलाइन फसवणूक असो किंवा अन्य प्रकारे सोशल मीडियावरील छळ असो, अशा माहिती तंत्रज्ञानाच्या गुन्ह्यांमधील तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे हे पोलिसांच्याही अवाक्याबाहेर गेले आहे. यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेत सायबर गुन्हेगारांपासून सावध राहणे गरजेचे आहे.

फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल साइट‌वर एकापेक्षा अधिक बनावट (फेक) अकाउंट पाहावयास मिळतात. तरुण, तरुणींनी अशा फेक अकाउंटच्या प्रोफाईलपासून चार हात लांब राहणे कधीही फायद्याचेच ठरेल, असे सायबर पोलीस सांगतात; मात्र अनेक तरुण, तरुणी अशा प्रोफाईलचे अश्लील तसेच मादक स्वरूपाची फोटो बघून आकर्षित होतात अन‌् त्यांना मोह आवरेनासा होतो. या मोहापायी फसव्या अकाउंटच्या प्रोफाईलवर भेट देत तरुण-तरुणींकडून ते तपासले जातात अन‌् अलगद ते सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. जेव्हा आपल्याला फसव्या अकाउंटधारकाकडून त्रास होऊ लागला, हे लक्षात येते, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री पटते अन‌् मग ते सायबर पोेलिसांकडे धाव घेतात.

---इन्फो--

कोरोना काळात तक्रारींत वाढ

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगारांकडून फेसबुकवरील बहुतांश अकाउंट हॅक करतात. ड्युप्लिकेट प्रोफाइल तयार करून संबंधित व्यक्तीच्या प्रोफाइलसोबत जोडलेल्या मित्र-मैत्रिणींच्या अकाउंटवर मेसेज पाठवून पैशांची मागणी संकटकाळात मदत म्हणून केली जाते.

सायबर गुन्हेगाराकडून असा प्रताप कोरोनाच्या काळात वाढल्याचे समोर आल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.

---इन्फो--

पोलिसांसाठी वेगळे पाेर्टल नाही

बनावट अकाउंटचा पर्दाफाश करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याकडे वेगळे असे कुठलेही पोर्टल अद्याप तरी अस्तित्वात नाही. बनावट अकाउंटच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडून फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाशी संबंधित मुख्यालयाकडे ई-मेलद्वारे तक्रार पाठविली जाते. संबंधित प्रोफाइलधारकाचे आधारकार्डची स्कॅन कॉपी तसेच मुख्य छायाचित्र वैयक्तिक माहिती पाठवून ती खरी असल्याचे सांगितले जाते. यानंतर फेसबुकडून ती पडताळणी करून महिनाभराच्या कालावधीत बनावट अकाउंट बंद केले जाते.

----इन्फो--

सात दिवसांत खाते बंद होते असे नाही....!

केंद्र सरकारकडून जरी बनावट खाते सात दिवसांत बंद केले जाते असा दावा केला जात असला तरीदेखील वस्तुस्थिती वेगळी आहे. सात दिवसांत नव्हे तर सायबर पोलिसांकडून ई-मेल पाठविल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर अशाप्रकारचे बनावट खाते बंद केले जातात. आयटी नियम जरी असले तरीदेखील अद्याप पुरेशी प्रभावी प्रगत यंत्रणा सायबर पोलिसांकडे उपलब्ध होऊ न शकल्याने सायबर गुन्हेगारी नियंत्रणात आणताना पोलिसांचीही दमछाक होत आहे.

---इन्फो--

तुम्हाला बनावट अकाउंट दिसले तर...

बनावट अकाउंट दिसले तर प्रथमत: त्या प्रोफाइलपासून आपण अंतर राखले पाहिजे. कोणत्याही मोहात न पडता अशाप्रकारच्या प्रोफाइलवर भेट देणे टाळावे.

आपल्याच नावाचे वेगळे बनावट अकाउंट तयार झाल्याचे लक्षात आले तर सर्वप्रथम त्या प्रोफाईलची यूआरएल कॉपी करून घेत आपल्या मूळ अकाउंटच्या प्रोफाइलवरून संदेश वॉलद्वारे याबाबत आपल्या सोशल मीडियाच्या मित्र परिवाराला अवगत करणारे आवाहन प्रसिद्ध करावे, यामध्ये ही यूआरएल पेस्ट करून याद्वारे प्राप्त झालेल्या संदेशांना कुठलाही प्रतिसाद देऊन नये.

बनावट यूआरएलची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहून द्यावी. जेणेकरून फेसबुक असो किंवा इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल माध्यमांना ती कळविणे सोपे होईल.

बनावट प्रोफाईलसंदर्भात आपल्या मित्र परिवाराला अधिकाधिक संख्येने फेसबुककडे ‘रिपोर्ट’ करण्याचे आवाहन करावे. जितके जास्त रिपोर्ट ऑनलाइन संबंधित प्रोफाइलबाबत नोंदविले जातील तेवढे लवकर ते खाते बंद होते.

---आलेख--- (वर्तुळाकार)

सायबर सेलकडे आलेल्या तक्रारी

वर्ष- २०१९- तक्रारी - २२८

वर्ष- २०२०- तक्रारी- ३७२

वर्ष-२०२१- तक्रारी-३९२

030721\03nsk_9_03072021_13.jpg~030721\03nsk_11_03072021_13.jpg~030721\03nsk_12_03072021_13.jpg

सोशल मिडियावरी बनावट अकाउंट~सोशल मिडियावरी बनावट अकाउंट~सोशल मिडियावरी बनावट अकाउंट