शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बनावट नोटा व्यवहारात आणणा-या तरूणाला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 1:44 PM

पिंपळगाव बसवंत : शंभर रूपयांच्या तीस बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणा-या पिंपळगाव बसवंत येथील युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकत अटक करून गजाआड केले आहे.

पिंपळगाव बसवंत : शंभर रूपयांच्या तीस बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाºया पिंपळगाव बसवंत येथील युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकत अटक करून गजाआड केले आहे. तब्बल अडीच महिन्यांनंतर पोलिसांना आरोपीस पकडण्यात यश मिळाले.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १ जानेवारी २०२० रोजी रात्री नऊच्या सुमारास युनियन बँक इंडियाचे बचत खाते असलेला पियुष विजय तोडकर याने पिंपळगाव शाखेच्या डिपॉझटि मशीनमध्ये नवीन शंभर रु पयांच्या चलनाच्या बनावट तीस नोटा आपल्या बचत खात्यात जमा केल्या असता त्या नोटा बनावट असल्याने फेक डिपॉझटिमध्ये जमा झाल्या. पोलिसांनी या गुन्ह्याचा शोध घेतला असता पिंपळगाव येथील पियुष विजय तोडकर यास अटक केली. चलनी नोटा स्वत: तयार करून स्वत: बाळगून व त्या व्यवहारात आणल्या म्हणून युनियन बँक इंडिया पिंपळगाव बसवंतचे उपशाखा अधिकारी क्षितिज घनश्याम विसावा यांच्या फिर्यादीने आरोपीविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी करीत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक