शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

काजव्यांच्या झगमगाटाची पर्यटकांना भूरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:34 PM

घोटी : भंडारद-याच्या धरतीला वर्षाराणीची चाहुल लागली असून काजव्यांच्या चंदेरी दुनियेची चकमक हिरडा , बेहडा , सादडा या झाडावर नृत्य करण्यास धजावत असल्याचे दिसू लागले आहे . या प्रकाशमयी तारकांच्या आगमनाचे संकेत म्हणजेच मान्सुनचं आगमन लवकर होणार असल्याची प्रतिक्रि या आदिवासी बांधवाकडुन व्यक्त होत आहे. भंडारदरा परिसरात काजव्यांच्या मायावी दुनियेचे ...

घोटी : भंडारद-याच्या धरतीला वर्षाराणीची चाहुल लागली असून काजव्यांच्या चंदेरी दुनियेची चकमक हिरडा , बेहडा , सादडा या झाडावर नृत्य करण्यास धजावत असल्याचे दिसू लागले आहे . या प्रकाशमयी तारकांच्या आगमनाचे संकेत म्हणजेच मान्सुनचं आगमन लवकर होणार असल्याची प्रतिक्रि या आदिवासी बांधवाकडुन व्यक्त होत आहे. भंडारदरा परिसरात काजव्यांच्या मायावी दुनियेचे भंडारद-याच्या अभयारण्यात आगमन झाले असून कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्याच्या अनेक वृक्षराजीवर हे मनमोहक काजवे अधिराज्य गाजवण्यासाठी सरसावले आहेत . संपुर्ण जंगलाला जणु विद्युत रोषणाईने वेढले असल्याचे दृश्य नजरेस अनुभवयास मिळत आहे. या काजवा महोत्सवाचे यावर्षीचे आयोजन भंडारदरा येथील कळसुबाई हरिशचंद्र गड अभयारण्य , वन्यजीव भंडारदरा यांनी केले असुन अनेक नियम हे काजवा प्रेमीसाठी बनविले आहेत . भंडारदरा म्हटलं कि पर्यटकांना आठवण येते जलोस्तवाची . पंरतु याच भंडारद-याच्या निसर्गात अजुनही खुप काही दडलेले आहे याची पारख ही भंडारद-याच्या वनविभागाने नेमकी हेरली. पावसाच्या आगमनाच्या अगोदर काजव्यांची मायावी दुनिया वनसाम्राज्यात कसे राज्य करते हे निसर्ग प्रेमींच्या मनावर बिंबविले. काजव्यांचा हा निसर्गरु पी अविष्कार पुढे काजवा महोत्सव या नावाने उदयास आणला .या काजवारु पी प्रकाशफुलांचा जंगलामध्ये झाडावर चाललेला पाठशिवनीचा खेळ पाहण्यासाठी पुणे , मुंबई , नाशिक या प्रमुख शहरासह संपुर्ण महाराष्ट्रच नाही तर परराज्यातुनही अनेक निसर्गप्रेमी आसुसलेले आहेत . हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा मोजक्याच झाडांवर काजव्यांचा काही दिवसांचाच‘बसेरा’ असतो.आदिवासी खेड्यांच्या शिवारातली सहस्रावधी झाडे अक्षरश: कोट्यवधी काजव्यांनी लगडून गेली आहेत. ज्या विशिष्ट झाडांवर काजवे वस्ती ला आलेले आहेत, ती झाडे िसमस ट्री सारखी दिसताहेत! झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर अगणति काजव्यांची आरास केली आहे . त्यांचे कित्येक भाईबंद झाडांभोवती पिंगा घालताहेत. विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरु आहे .एका लयीत, तालात अन् सुरातही! आपण बघितलं ते दृश्य आणखीन कोणाला दाखवण्याच्या हेतूने हातातले मोबाईल किंवा ििडजटल कॅमेरे फोटोसाठी पुढं सरसावतात. काजवे काही कॅमेर्यांना बधत नाहीत, ते काही केल्या जेरबंद होत नाहीत! आम्हाला बघायचंय तर तुमचे डोळे हेच जगातले उत्तम कॅमेरे आहेत, असेच जणू काजवे आपल्याला सांगताहेत. लखलख तेजाची ती चंदेरी दुनिया बघताना आपण धरणीवरचा स्वर्ग पाहात असल्याची भावना मात्र आपल्या मनाला आत आतपर्यंत सुखावत राहते...भंडारद-याच्या वनामधील काजवा महोत्सव अनुभवण्यासाठी असंख्य निसर्गप्रेमी दाखल झाले असुन अनेक मोठमोठी हॉटेल्स सजली आहेत . आदिवासी पट्ट्यामध्येही ब-याच ठिकाणी स्वादिष्ट असे जेवण देण्यासाठी स्थानिक तरु ण सरसावले आहेत . ग्रामिण भागातील लोकनृत्याची कला ही या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ व नासिक येथील ट्रॅव्हल्स असोसियसनने या काजवा प्रेमीसाठी आयोजित केली आहेत . 

टॅग्स :Nashikनाशिक