‘महाआवास’ अभियान कार्यशाळा शुक्रवारी भुजबळ यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी महा आवास अभियानाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, २० नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय आवास दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत शंभर दिवसीय महा आवास अभियान ग्रामीण राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत १७१४ भूमिहीन लाभार्थीपैकी ६६२ लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या अभियाना अंतर्गत पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत ४९ हजार ८१३ घरकुले, शबरी आवास योजनेतून ४ हजार ५३५ घरकुले, रमाई आवास योजनेतून ४ हजार ९१४ घरकुले, पाथरी आवास योजनेतून ५३ घरकुले लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून १ हजार ८७५ लाभार्थ्यांना ग्रामीण गवंडी प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती बनसोड यांनी दिली.
या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जि.प. सदस्य महेंद्र काले, सिद्धार्थ वनारसे यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच, प्रशासक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. शेवटी महाआवास अभियान योजनेचे होर्डिंज, पोस्टर व बॅनर व जिंगल्स यांचे अनावरण करण्यात आले. (फोटो ०५ आवास)-