लासलगाव : देशात इतरत्र असलेल्या राज्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे कांद्याचे दर कोसळण्यास सुरुवात झाली आहे. शनिवार, रविवारच्या दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये पुन्हा ४०० रुपयांची घसरण झाली. ५ फेब्रुवारीच्या तुलनेत कांदा दरात १३०० रु पयांची घसरण झाल्याने कांद्याचे दर पंधराशे रुपयांच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण असून, ही घसरण लवकर न थांबल्यास कांदा उत्पादक अडचणीत सापडतील. देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातसह पश्चिम बंगालमध्ये नवीन कांद्याची आवक झाल्याने तर राज्यातील पुणे व नगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याचे पीक निघाल्याने मागणी कमी झाली असल्याचे मत सभापती जयदत्त होळकर यांनी व्यक्त केले आहे. कांद्याचे सरासरी दरामध्ये घसरण होण्यामागे कांद्याची इतरत्र व स्थानिक बाजारात वाढलेली आवकदेखील कारणीभूत असल्याचेही मत कांदा तज्ज्ञ व्यक्त करत आहेत, तर होळीसाठी कामगार सुट्टीवर जात असल्याने कांदा लोडिंगसाठी मजूर नसल्यानेही कांदा खरेदीवर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. कांदा लागवडीपासून तर बाजार विक्र ीपर्यंत कांदा उत्पादक शेतकºयांना १० ते १२ रु पये प्रतिकिलोमागे खर्च येतो त्यामुळे आज विक्र ी होणार कांदा हा उत्पादक १ ते ३ रु पये किलोमागे तोट्यात विक्र ी करताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातील २० फेब्रुवारी रोजी याच कांद्याला जास्तीत जास्त १७९०, सरासरी १६८०, कमीत कमी हजार रुपये भाव मिळत होता. मात्र सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवसी कांद्याला जास्तीत जास्त १३१५, सरासरी ११५०, कमीत कमी ९०० भाव मिळाल्याने कांदा उत्पादक भलताच नाराज दिसत आहे.
मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे कांदा भावात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:22 AM