सप्ताहात गव्हाची एकूण आवक ८२ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान १६२० ते कमाल २१०० रुपये, तर सरासरी १८०० रुपयांपर्यंत होते. बाजरीची एकूण आवक ४२७ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान १३२८ ते कमाल १८५०, तर सरासरी १६०० रुपयांपर्यंत होते. हरभऱ्याची एकूण आवक १८३ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान ३३५० ते कमाल ५०१६, तर सरासरी ३९३९ रुपयांपर्यंत होते.
मुगाची एकूण आवक ४४५ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान ४००० ते कमाल ७४५१, तर सरासरी ६८५० रुपयांपर्यंत होते. सोयाबीनची एकूण आवक १०४८ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान ४००० ते कमाल ७१०१, तर सरासरी ५००० रुपयांपर्यंत होते. मक्याची एकूण आवक ३७१ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान १०३१ ते कमाल १७८१, तर सरासरी १३५० प्रतिक्विंटलपर्यंत होते. सप्ताहात येवला बाजार समिती मुख्य आवारावर टोमॅटोच्या आवकेत घट झाली, तर बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. टोमॅटोस देशांतर्गत मागणी चांगली राहिली. टोमॅटोची एकूण आवक १० हजार क्रेटस् झाली असून बाजारभाव किमान १०० ते कमाल ५००, तर सरासरी ३५० रुपये प्रती क्रेट्सप्रमाणे होते.