ताहाराबाद : हरणबारी धरणाच्या गेट दुरुस्तीचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर सहाच दिवसांत धरणपूर्णपणे भरून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, यामुळे मोसम परिसरातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे.मोसम परिसरातील पाण्याचा प्रश्न हा सर्वस्वी हरणबारी धरणावर विसंबून आहे. उन्हाळ्यात संपूर्ण मोसम परिसर पाणीप्रश्नाने ग्रासला होता. त्यात पावसाळा लांबला यामुळे पाणीप्रश्नाची झळ चांगलीच सोसावी लागली. शेती व्यवसाय तर पाणीटंचाईमुळे ठप्प झाला. तब्बल आठ ते दहा दिवसांनी नळ पाणीपुरवठा योजनांमधून पाणी येत होते. हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. अशा भयानक परिस्थितीला जनता सामोरी गेली असताना लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे पश्चिम आदिवासी पट्ट्यातून हरणबारी धरण कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेकडो क्यूसेस पाणी नदीद्वारे वाहून जात होते. यामुळे गेटच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. हरणबारी धरणातून वर्षभरात सोडण्यात येणाºया पाण्याच्या रोटेशनवरच मोसम परिसरातील शेती पाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो.यंदा पावसाळा लांबला, उन्हाळ्यात व पावसाळ्यातही पाणीप्रश्न कायम असल्याने मोसम परिसरातील जनता हैराण झाली होती. जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाला सुरुवात झाली होती.
हरणबारी धरण ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 1:29 AM
हरणबारी धरणाच्या गेट दुरुस्तीचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर सहाच दिवसांत धरण पूर्णपणे भरून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, यामुळे मोसम परिसरातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देमोसम परिसरात समाधान : गेट दुरुस्तीनंतर सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग