नाशिक : स्त्रियांचे कनिष्ठत्व जोपासणारा पुरुषी अहंकार आजही समाजात रूढ आहे. मनुस्मृती दहनानंतरही समाजात आजही जात-धर्मातील विषमता आणि स्त्रियांचा अनादर करणाऱ्या कुप्रथा-परंपरा कायम असल्याची खंत लेखिका अनिता पगारे यांनी व्यक्त केली. परिवर्त परिवाराच्या वतीने मनुस्मृती दहन दिनाचे औचित्य साधत टागोरनगर येथील बुद्धविहाराच्या प्रांगणात ‘जागर समतेचा अर्थात कविता रस्त्यावर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनिता पगारे यांनी सांगितले की, समतेचे सर्व हक्क स्त्रियांनाही असावे. समाजातील कुप्रथा जोपर्यंत समूळ नष्ट होणार नाहीत तोपर्यंत भारत खऱ्या अर्थाने महासत्ता होणार नसल्याचेही पगारे यांनी सांगितले. त्यानंतर आयोजित कविसंमेलनात वंदना गायकवाड, अनिल पगारे, हर्षाली घुले, विजया बागुल, सागर सोनवणे, काशीनाथ वेलदोडे, गौरवकुमार आठवले यांनी रचना सादर केल्या. मुख्याध्यापक दिनकर पवार यांनी परिवर्त परिवाराच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रा. गंगाधर अहिरे यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)
स्त्रियांचा अनादर करणाऱ्या कुप्रथा अद्यापही कायम
By admin | Published: December 27, 2015 10:44 PM