शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

बनावट कागदपत्रांद्वारे भूमाफियाकडून गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:59 AM

वडिलोपार्जित जमिनीमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे स्वामित्वदोष निर्माण करत स्वत: मालक असल्याचे भासवून एका भामट्याने वीस लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक : वडिलोपार्जित जमिनीमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे स्वामित्वदोष निर्माण करत स्वत: मालक असल्याचे भासवून एका भामट्याने वीस लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित किशोर मोहनलाल सुगंध याने बनावट कागदपत्रांद्वारे साठेखत व मुखत्यारपत्र तयार करून अहमदाबाद येथे राहणाऱ्या एका वृद्धासह घटनेतील साक्षीदार हेमराज पाटील यांची फसवणूक केली.  अहमदाबादच्या सायन सिटी येथे गौतम शांतिलाल मिश्री हे राहत असून, संशयित सुगंध याने जून २००८ मध्ये मिश्री यांच्या खासगी मालकीच्या पंचवटीतील दिंडोरीरोडवर असलेल्या सिटी सर्व्हे क्र. १३२/७/२/मधील ३९८२५.५७ चौरस मीटरपैकी १४८५.७८ इतक्या क्षेत्राचे बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे साठेखत व मुखत्यारपत्र बनविले आणि स्वत: मालक असल्याचे भासवून त्याने मिश्री व त्यांच्या नातेवाइकांच्या खोट्या स्वाक्षºया केल्या. पाटील यांना चक्क २० लाखांना गंडा घातल्याचे फिर्यादीत मिश्री यांनी म्हटले आहे. सुगंधविरुद्ध अशा पद्धतीचा फसवणुकीचा गुन्हा यापूर्वी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणी मिश्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुगंधविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयात खटलासंशयित सुगंध दाम्पत्य यांची टोळी असून, वडिलोपार्जित जमिनींचा शोध घेत मूळ मालकाच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार करून परस्पर जमीन विक्री करण्याचा बेकायदेशीर व्यवसायामध्ये यापूर्वीही सुगंधवर गुन्हा दाखल आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात नितीन रामचंद्र खोत यांनी फसवणुकीचा गुन्हा सुगंधविरुद्ध २००६ साली दाखल केला असून, फौजदारी न्यायालयात या गुन्ह्णाचा खटला सुरू आहे. या खटल्यात सुगंध हा प्रथम क्रमांकाचा संशयित आरोपी आहे. गायकवाड मळा भागात खोत यांची वडिलोपार्जित जमीन आहे. सुमारे चार एकर जागेची खोटी कागदपत्रे तयार करून सुगंधने स्वत:सह पत्नी रेखाच्या नावावर जागेची खरेदी केल्याचा गुन्हा आहे.धमकावून उकळले वीस लाखगौतम मिश्री व हेमराज पाटील यांच्यात जमिनीचा व्यवहार २०१४ साली झाला; मात्र सुगंध याने सदर जमिनीची खोटी कागदपत्रे तयार क रून स्वत: जमीन मालक असल्याचे सांगून पाटील यांना धमकावले. न्यायालयात दावाही दाखल केला आणि मागील वर्षी वीस लाख रुपये उकळले. संशयित सुगंध हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा