पेठ : कुटुंबात सर्व आशिक्षित, अज्ञानाचा अंधार, घरात अठराविश्व दारिद्र्य यामुळे टिचभर पोटाची खळगीही भरू न शकणाºया पेठ तालुक्यातील आडगाव (भू) येथील एका गरीब कुटुंबातील लहानग्या बालिकेचे भविष्य उजळले असून, सामाजिक संवेदना असलेल्या डॉक्टर दांपत्याच्या आर्थिक मदतीच्या जोरावर उज्ज्वला आता शिक्षणात आपली गरुडझेप घेण्यास सज्ज झाली आहे. पेठपासून २० किमी अंतरावर गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या आडगाव येथील कमलाकर गायकवाड व तारा गायकवाड हे दांपत्य गावात रोजगार उपलब्ध होत नसल्याने लहानशा तीन बालकांसह नाशिक शहरात दाखल झाले. आर्थिक परिस्थिती बेताची यामुळे मोलमजुरीशिवाय पर्याय नाही, म्हणून तपोवनात एका रोपवाटिकेत मजुरी करू लागले. मुलगी उज्ज्वला शाळेत जाऊ लागली. वर्गातील अतिशय हुशार मुलगी असल्याने तिचे वर्गशिक्षक अविनाश वाघ यांनी तिच्या आर्थिक परिस्थितीबद्दल जाणून घेतले. आणि निव्होकेअर फार्माच्या संचालकांच्या कानावर तिची कहाणी कथन केली. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भावना अहिरराव व डॉ. विजय अहिरराव यांनी उज्ज्वलाच्या पुढील शिक्षणाची आर्थिक जबाबदारी स्वीकारली. मराठी भाषा दिनी उज्ज्वलाला आर्थिक मदतीचा धनादेशही सुपूर्द केला. यावेळी निव्हो केअरचे संचालक सतीष चितोडकर, मुख्याध्यापक प्रतिभा सोनजे, भरत गांगुर्डे, अविनाश वाघ उपस्थित होते.
आडगावातील कुटुंब :सेवाभावी दांम्प्याच्या मदतीमुळे शिक्षणाचा मार्ग मोकळा आदिवासी कन्येचे भविष्य ‘उज्ज्वल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:04 AM
पेठ : कुटुंबात सर्व आशिक्षित, अज्ञानाचा अंधार, घरात अठराविश्व दारिद्र्य यामुळे टिचभर पोटाची खळगीही भरू न शकणाºया पेठ तालुक्यातील आडगाव (भू) येथील एका गरीब कुटुंबातील लहानग्या बालिकेचे भविष्य उजळले.
ठळक मुद्देशिक्षणात आपली गरुडझेप घेण्यास सज्ज झाली मराठी भाषा दिनी उज्ज्वलाला आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द