नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे घरोघरी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. पाच दिवसांच्या या मोहिमेत प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याचा ऑक्सिजन, ताप, खोकला तसेच अन्य तपासणी करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणात ज्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी आणि पल्स रेटचे प्रमाण जास्त आहे, अशा रुग्णांना तत्काळ रुग्णालयात पाठवले जाणार आहे. तालुक्यातील दोडी व नांदूरशिंगोटे परिसरात सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यान महसूलचे विभागीय उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, सभापती शोभा बर्के, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच रामदास सानप, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के, मंडल अधिकारी भालचंद्र शिरसाठ, विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे, ग्रामविकास अधिकारी एन. बी. हासे, प्रणाली दिघे, दीपक बर्के, आदींंसह ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
इन्फोा
रुग्णसंख्या वाढती डोकेदुखी
तालुक्यातील नांदूरशिंगोटे ही परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असून, आसपासच्या गावांचा दररोज खरेदी-विक्रीसाठी संबंध येतो. त्यामुळे गावात गेल्या पंधरा दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. आज नांदूरशिंगोटे येथे साडेबाराशेच्या आसपास कुटुंब आहेत तर वर्षभरात ३००च्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सध्या ३० ते ३५ रुग्णांवर खासगी, शासकीय रुग्णालयात तसेच घरी उपचार सुरू आहेत.
फोटो - २९ सिन्नर नांदूरशिंगोटे
नांदूरशिंगोटे येथे कुटुंब सर्वेक्षणाची प्रत्येक माहिती महसूल विभागाचे उपआयुक्त गोरक्ष गाडीलकर यांनी घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, राहुल कोताडे, मोहन बच्छाव, गोपाल शेळके, दीपक बर्के, आदी उपस्थित होते.
===Photopath===
290421\29nsk_4_29042021_13.jpg
===Caption===
फोटो - २९ सिन्नर नांदूरशिंगोटे नांदूरशिंगोटे येथे कुटुंब सर्वेक्षणाची प्रत्येक माहिती घेताना महसूल विभागाचे उपआयुक्त गोरक्ष गाडीलकर. समवेत उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, राहुल कोताडे, मोहन बच्छाव, गोपाल शेळके, दीपक बर्के आदी.