तिरंगी लढत एकतर्फी करीत फरांदे यांची बाजी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:19 AM2019-10-25T01:19:52+5:302019-10-25T01:21:00+5:30

गत पाच वर्षांत केलेल्या कामकाजांची पोचपावती मिळवत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य मतदारसंघात २८ हजार ३९८ मतांच्या आघाडीसह एकतर्फी विजय मिळवला.

 Farande's side in triangular fight! | तिरंगी लढत एकतर्फी करीत फरांदे यांची बाजी !

तिरंगी लढत एकतर्फी करीत फरांदे यांची बाजी !

Next

नाशिक : गत पाच वर्षांत केलेल्या कामकाजांची पोचपावती मिळवत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य मतदारसंघात २८ हजार ३९८ मतांच्या आघाडीसह एकतर्फी विजय मिळवला. कॉँग्रेसच्या उमेदवार डॉ. हेमलता पाटील ४५ हजार ०६२ मतांसह दुसऱ्यास्थानी, तर मनसेचे नितीन भोसले २२,०४२ मतांसह तिसºया स्थानावर राहिले.
दादासाहेब गायकवाड सभागृहात गुरुवारी सकाळी झालेल्या मतमोजणीत नाशिक मध्यच्या भाजप उमेदवार देवयानी फरांदे यांना ७३,४६० मते मिळाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून फरांदे यांनी घेतलेली आघाडीअखेरपर्यंत कायम राखत बाजी मारली. केवळ पहिल्या फेरीत द्वितीय स्थानी असलेले मनसेचे उमेदवार भोसले हे दुसºया फेरीपासूनच तिसºया स्थानावर गेले, तर डॉ. पाटील यांनी दुसºया फेरीपासून फरांदे यांना काहीशी
लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक फेरीत फरांदे यांनी त्यांची आघाडी वाढवत एकूण २८,३९८ मतांनी विजय मिळवला. दुसºया फेरीपासून प्रत्येक फेरीत भोसले हे तिसºया स्थानावरच राहिले.
प्रारंभी तिरंगी भासणारी ही लढत फरांदे यांनी एकतर्फी ठरवली. या दणदणीत विजयाद्वारे फरांदे यांनी नाशिक मध्य मतदारसंघातील त्यांचे स्थान भक्कम केले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी विजयानंतर प्रचंड जल्लोष केला.
विजयाची तीन कारणे...
1प्रा. फरांदे यांनी गत पाच वर्षांत केलेल्या विकासकामांबद्दल जनतेमध्ये असलेले समाधान त्यांच्या मतांमध्ये परावर्तित झाले.
2गर्भश्रीमंत मतदारांपासून मध्यमवर्गीय आणि अत्यंत गोरगरीब अशा सर्व स्तरातील मतदारांशी कायम ठेवलेला संपर्क त्यांच्या उपयोगी आला.
3भाजपच्या पारंपरिक मतदाराने दिलेली साथ तसेच जुने नाशिक आणि गावठाणातील मतदारांनीदेखील अपेक्षेप्रमाणे मतदान केल्याचा फायदा झाला.
पराभवाचे कारण...
पक्षाने ऐनवेळी उमेदवारी दिल्याने मिळालेला अत्यल्प वेळ तसेच कॉँग्रेसच्या कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा डॉ. हेमलता पाटील यांच्यासाठी न झाल्याने पाठबळ मिळाले नाही. तसेच राष्टÑवादीकडूनही पुरेशी साथ न मिळाल्याचा फटका त्यांना सहन करावा लागला.

Web Title:  Farande's side in triangular fight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.