लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : शहरात गणेश मंडळांसह घरोघरी प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचे आज विधिवत पद्धतीने विसर्जन होणार आहे. महापालिकेनेदेखील गणेश मंडळांसह नागरिकांना घरीच विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे.महानगरपालिकेद्वारे श्रीगणेश विसर्जनासाठी तेरा ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी नऊ ठिकाणी कृत्रिम कुंडांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातील वाल्मीकनगर शाळा येथील कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणी श्री विसर्जनाची रंगीत तालीम घेण्यात आली होती.महानगरपालिकेकडून श्री गणपती विसर्जनासाठी शहरातील विविध १३ ठिकाणी कृत्रिम कुंडांची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या उद्देशाने उक्त विसर्जन कुंडांची निर्मित करण्यात आली आहे. शहरातील श्री गणेश मंडळ, गणेश भक्त, नागरिकांनी आपल्या जवळच्या परिसरातील कृत्रिम कुंडांवर विसर्जन करावे, साथीची पार्श्वभूमी असल्याने शक्य झाल्यास नागरिकांनी घरगुती विसर्जनावर भर द्यावा, असे महापालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.सोयगाव फायर स्टेशनला सोयगाव नववसाहत व लगतचा परिसर तर अंबिका कॉलनी, गोळीबार मैदान, संभाजी नगर, भायगाव पुष्पाताई हिरे नगर स.नं. २०२ गणपती मंदिर मराठी शाळा परिसर, भायगाव गावठाण नदीकिनारी पुलाजवळ, कलेक्टर पट्टा स.नं. २६५ महारूद्र हनुमान परिसर, द्याने फरशी पुलाजवळ ग. नं. २४२, शिवाजी जिमखाना, कॅम्प गणेश कुंड येथे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे.श्री गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनामार्फत २४८ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन इतर सर्व आवश्यक उपायोजना व व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्कचा वापर करावा आणि नियमांचे पालन करावे, असे महापौर व आयुक्तांकडून आवाहन करण्यात आले आहे.मोहरम आणि गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले असून, नागरिकांनी शांततेत गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. घरगुती मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्थामहापालिकेने महादेव घाट येथे संगमेश्वर सार्वजनिक श्री गणेश मंडळ, गावठाणातील पूर्व भाग व लगतचा परिसरासाठी गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली. याशिवाय वाल्मीकनगर शाळेत संगमेश्वर गावठाणातील घरगुती श्री गणेशमूर्तीचे तर टेहेरे चौफुली गिरणा नदी येथे सोयगाव गावठाण घरगुती व सार्वजनिक श्री गणेश मूर्ती, अयोध्यानगर, स्वप्नपूर्तीनगर व परिसरासाठी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
बाप्पांना आज निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2020 12:04 AM
मालेगाव : शहरात गणेश मंडळांसह घरोघरी प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचे आज विधिवत पद्धतीने विसर्जन होणार आहे. महापालिकेनेदेखील गणेश मंडळांसह नागरिकांना घरीच विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. महानगरपालिकेद्वारे श्रीगणेश विसर्जनासाठी तेरा ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी नऊ ठिकाणी कृत्रिम कुंडांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातील वाल्मीकनगर शाळा येथील कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणी श्री विसर्जनाची रंगीत तालीम घेण्यात आली होती.
ठळक मुद्देविसर्जनाची तयारी पूर्ण : ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात; कृत्रिम कुंडांची निर्मिती