लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : कोरोनाचा संसर्ग आणि गणेशोत्सवाबाबत प्रशासनाने घालून दिलेले नियम यामुळे या वर्षी पेठ शहर व तालुक्यात अत्यंत साधेपणाने गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी सार्वजनिक गणेश मंडळाची संख्या कमी दिसून आली. पेठ येथील महादेव मंदिर तलाव व संगमेश्वर बंधाऱ्यात सकाळपासूनच घरगूती गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी भाविकांनी योग्य शारिरीक अंतर ठेवत हजेरी लावली.दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांनी ही कोणताही गाजावाजा न करता गश्रायाच्या जय घोषात गणेश विसर्जन केले. बाजारात गर्दी वाढू नये यासाठी बहुतांश भाविकांनी शाडू मातीपासून घरीच मुर्ती तयार करून स्थापना केली होती. अशा बाप्पाचे घरीच विसर्जन करणे भाविकांनी पसंत केले. विसर्जन स्थळी पेठ पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पेठ तालुक्यात साधेपणाने गणरायाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 2:34 PM
पेठ : कोरोनाचा संसर्ग आणि गणेशोत्सवाबाबत प्रशासनाने घालून दिलेले नियम यामुळे या वर्षी पेठ शहर व तालुक्यात अत्यंत साधेपणाने गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
ठळक मुद्देमागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी सार्वजनिक गणेश मंडळाची संख्या कमी